डोणगाव येथे क्रांतीवीर संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती उत्साहात साजरी
डोणगाव प्रतिनिधी सालार बेग
बंजारा समाजाचे आराध्य दैवत क्रांतीवीर संत सेवालाल महाराज यांची २८७ वी जयंती १५ फेब्रुवारी रोजी डोणगाव येथे विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने गावातील विविध संघटना, राजकीय पक्ष आणि ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात ध्वज पूजनाने झाली. काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष शैलेशभाऊ सावजी यांच्या हस्ते संत सेवालाल महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हार अर्पण करण्यात आला. यावेळी शिवसेना (उबाटा) गटाचे निबाजी पांडव, भाजपा विद्यार्थी जिल्हाध्यक्ष विलास परमाळे , डोणगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, जयपाल भैय्या पांचाळ, करवते सर, गाडे सर, देविदास चव्हाण आणि पत्रकार गणेश वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रामपंचायत कार्यालयातही कार्यक्रमाचे आयोजन
डोणगाव ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित जयंती कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच चरण पाटील आखाडे होते. त्यांच्या हस्ते महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच श्याम इंगळे, माजी सरपंच जुबेर खान, सद्दाम शहा, राजेश जाधव, पत्रकार संघाचे अध्यक्ष सचिन गाभणे, हमीद भाई मुल्लाजी, सुरेशभाऊ फिसके आणि अब्रार मिल्ली यांची प्रमुख उपस्थिती होती.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डोणगाव येथील नाईक अनिल राठोड व कारभारी सतीश राठोड संदीप राठोड यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन राहुल चव्हाण यांनी केले. या सोहळ्याला गावातील नागरिक व बंजारा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने आणि उत्साहात महाराजांची जयंती साजरी केली.