राजपुरी गणातील विजयी उमेदवार विघ्नेश दादा माळी यांचा आगरदांडा आदिवासी समाजाला शब्द — “प्रत्येक योजना घराघरात पोहोचवणार”
(अगरदांडा / साकिब गजगे) नुकत्याच ७ फेब्रुवारी २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत राजपुरी तालुका मुरुड जंजिरा गणातून विजयी झालेले विघ्नेश दादा माळी यांनी आज आगरदांडा येथील आदिवासी समाजाची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आदिवासी बांधवांना भात देत त्यांचा सन्मान केला तसेच त्यांच्या विकासासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले.
या भेटीदरम्यान विघ्नेश दादा माळी यांनी उपस्थित नागरिकांशी मनमोकळा संवाद साधत सांगितले की, “आदिवासी समाजाच्या हक्काच्या सर्व शासकीय योजना पूर्णपणे मिळाल्याच पाहिजेत. कोणताही लाभार्थी वंचित राहणार नाही, याची मी स्वतः जबाबदारी घेईन. प्रत्येक योजना घराघरात पोहोचवून आदिवासी समाजाचा सर्वांगीण विकास करण्याचा माझा संकल्प आहे.”
त्यांच्या या आश्वासनामुळे उपस्थित आदिवासी बांधवांमध्ये समाधान आणि विश्वासाचे वातावरण निर्माण झाले. गावातील अनेक नागरिकांनी त्यांचे स्वागत करून अभिनंदन केले आणि भविष्यातही अशाच प्रकारे समाजासाठी काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
या कार्यक्रमाला ऋषिकांत डोंगरिकर, अश्विनी जंगम, आदित्य जाधव, संजय जंगम, सदाशिव-राजेश जाधव, संताराम हिलम, दीपक जाधव, किरण जंगम, गणेश जाधव, आशिष जाधव आणि तुकाराम जाधव हे प्रमुख कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित कार्यकर्त्यांनी सांगितले की, विघ्नेश दादा माळी हे निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष कामाला लागले असून त्यांच्या या कृतीमुळे सर्वसामान्य नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.
राजपुरी गणातील नागरिकांनी व्यक्त केले की, अशा प्रकारे समाजात जाऊन प्रत्यक्ष लोकांशी संवाद साधणारा लोकप्रतिनिधी मिळणे ही त्यांच्या दृष्टीने अभिमानाची बाब आहे. त्यामुळे येत्या काळात रायगड जिल्हा मधील या भागाचा विकास अधिक वेगाने होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
एकंदरीत, या भेटीमुळे आदिवासी समाज आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील नाते अधिक मजबूत झाले असून विकासाच्या दृष्टीने ही सकारात्मक सुरुवात मानली जात आहे.