logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

पंचायत समिती अहमदपूर कर्मचाऱ्यांचा 16 फेब्रुवारी पासून असहकार आंदोलनाचा एल्गार.....

पंचायत समिती अहमदपूर कर्मचाऱ्यांचा 16 फेब्रुवारी पासून असहकार आंदोलनाचा एल्गार.....
( विशेष प्रतिनिधी ) शिवाजी श्रीमंगले
पंचायत समिती अहमदपूर कर्मचाऱ्यांचा जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय अधिकारी कर्मचारी संघटनेच्या वतीने प्रलंबित मागण्यासाठी आज पासून असहकार आंदोलनाचा एल्गार चालू झाला.
महाराष्ट्र शासनाच्या प्रशासनाचा मुख्य आधारस्तंभ असलेल्या जिल्हा परिषदेच्या लिपिक संवर्गाच्या चौथ्या वेतन आयोगापासून वेतनश्रेणीत असलेली तफावत दूर करून सुधारित वेतनश्रेणी लागू करणे व पदोन्नती स्तर कमी करून पदनामात बदल करणे तसेच 2005 नंतर लागलेल्या व अनुकंपा प्रतिक्षा सूचीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना जशास तशी जुनी पेन्शन योजना लागू करणे इत्यादी मागन्याणासाठी संघटनेने असहकार आंदोलन चालू केले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी उपजिल्हाधिकारी तहसीलदार व गटविकास अधिकारी यांना आंदोलनासंदर्भात निवेदन दिले आहे.
यापूर्वी अनेक वेळा मागण्या करूनही शासनाने दखल घेतली नसल्याने असहकार आंदोलन करण्याचा निर्णय संघटनेने घेतला. सोमवारी कार्यालयात येऊन स्वाक्षरी करणे निवेदन देणे काळीफीत लावून बसून राहणे. मंगळवार ते शुक्रवारी आंदोलन सुरूच राहील. 23 फेब्रुवारी पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलनाचा इशारा दिल्याची माहिती संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष शरद बिरादार यांनी दिले.
यावेळी संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रवीण भोसले यांनी मार्गदर्शन केले आंदोलनास शैलेश जोशी राजू सोनकांबळे संगमेश्वर नागरगोजे सचिन गुंडरे किरण दांडेगावकर संजय आकूलवाड अमित कळसकर राजू तीर्थकर जिल्हा प्रतिनिधी वर्षा भगत संध्या होंदरणे मनीषा मिरजकर बबीता भिंगोलीकर रेणुका खंदाडे दीपमाला ढोकळे लक्ष्मीकांत उजळमकर सुनील शिंदे आनंदकुमार पापसेटवार सुरेश स्वामी यासह तालुक्यातील आदी सर्व असंख्य लिपिक व महिला लिपिक हजर होते.

132
3833 views

Comment