logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

विद्यानगर वार्डातील तथागत बुद्ध विहार बल्लारपूर येथे प्रथमच छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना कार्यक्रम


रोहन कळसकर ( मुख्य संपादक क्रांतीसुर्य न्युज)

बल्लारपूर:- तथागत बुद्ध विहार व रमाई महिला मंडळ, विद्यानगर वार्ड बल्लारपूर येथे आज दिनांक 19/02/2026 रोज गुरुवार ला छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त मानवंदना कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आली .
कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला रमाई महिला मंडळाचे अध्यक्षा सौ. पौर्णिमा नीमसटकर यांच्या शुभहस्ते पुष्पहार करून करण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून दिंगाबर झामरे उपस्थित होते. व तसेच सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते पुष्पहार व माल्या अर्पण केले व त्यानंतर मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जिवन संघर्षावर व त्यांच्या कार्यावर प्रकाश टाकुन आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमाला तथागत बुद्ध विहार समिती चे अध्यक्ष निशिकांत खैरे, उपाध्यक्ष प्रदीप झामरे, सह सचिव दिपक वाळके , रतन बांबोळे, मिथुन निमसटकार, गणेश कोकाटे, राकेश शिवनकर, अश्वजीत रामटेके, दिगांबर झामरे, अशोक मेश्राम, देवराव मेश्राम, कपिल कळसकर, सुमेध हिवरकर , महिला मंडळाचे विद्या वैद्य, श्वेता झामरे, वैशाली कवाडे, निमसटकर ताई सह इतर सर्व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते

7
2734 views

Comment