logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अहिल्यानगरमध्ये मोठी खळबळ! फुटबॉल क्लबच्या नावाखाली तरुणांची दहशतवादी संघटनेत भरती करण्याचा डाव उधळला

अहिल्यानगर:
राज्यात पुन्हा एकदा दहशतवादाचे सावट निर्माण करण्याचा प्रयत्न महाराष्ट्र एटीएसने (ATS) यशस्वीरित्या उधळून लावला आहे. अहिल्यानगर आणि यवतमाळ जिल्ह्यातील पुसद भागात धाडी टाकून एटीएसने एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, 'फुटबॉल क्लब'च्या नावाखाली उच्चशिक्षित तरुणांचे ब्रेनवाशिंग करून त्यांना कट्टरतावादाकडे ओढले जात असल्याचे तपासात समोर आले आहे.गेल्या पाच महिन्यांपासून एटीएसचे पथक या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. रविवारी (१५ फेब्रुवारी २०२६) मध्यरात्री अहिल्यानगरमधील मुकुंदनगर, तपोवन रोड आणि कोठला परिसरात सुमारे १२ ठिकाणी छापे टाकण्यात आले. याच वेळी यवतमाळच्या पुसद आणि उमरखेड भागातही १७ ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
तपासातील धक्कादायक खुलासे
तरुणांना एकत्र करण्यासाठी फुटबॉल क्लबचा आधार घेतला जात होता. खेळाच्या बहाण्याने त्यांना एकत्र बोलावून त्यांचे 'रॅडिकलायझेशन' कट्टरपंथी विचारांकडे वळवणेकेले जात होते.
संशयित तरुणांना केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्याची तयारी सुरू होती, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कारवाईत तलवारी, गुप्त, चाकू यांसारखी ८ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. तसेच लॅपटॉप, मोबाईल आणि काही संशयास्पद कागदपत्रेही हस्तगत करण्यात आली आहेत.भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अमिर हमजा जफर शेख (वय २१) आणि असद जुबेर सय्यद या दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.
"उच्चशिक्षित मुस्लिम तरुणांना लक्ष्य करून त्यांना नव्या दहशतवादी संघटनेत सामील करून घेण्याचा हा कट होता. एटीएसच्या सतर्कतेमुळे मोठी जीवितहानी किंवा घातपाती कारवाया टळल्या आहेत." - एटीएस सूत्र
या कारवाईनंतर अहिल्यानगर शहरात मोठी खळबळ उडाली आहे. मुकुंदनगर सारख्या संवेदनशील भागात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी एटीएसची पथके अजूनही कार्यरत आहेत.

129
4040 views

Comment