logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती गानली समाज बहुउद्देशीय मंडळ, अहेरी येथे उत्साहात साजरी

अहेरी : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शूरवीर, धर्मवीर आणि संपुर्ण हिंदवी स्वराज निर्माते , सकल समाजाचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती गानली समाज बहुउद्देशीय मंडळ, अहेरी यांच्या वतीने आज अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला गानली समाज बह. मंडळाचे अध्यक्ष श्री नरेश व्यंकटेश बोम्मावार, उपाध्यक्ष श्री प्रफुल रामन्नाजी नागुलवार, श्री. व्यंकटेशजी सुरमवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात केले महाराजांच्या पराक्रम, शौर्य आणि स्वराज्य स्थापनेतील महान कार्याची आठवण करून देत. श्रीकांत पोचरेड्डी गद्देवार यांनी आपल्या भाषणात छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त महाराष्ट्रापुरते राजे नसुन संपुर्ण भारताचे राजे होते. त्यांचे आचरण आणि रयतेच्या हित आणि मुघलांच्या होणाऱ्या अत्याचारापासून रयतेला रक्षण देण्याचे काम छञपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी केली. ते वारसा हक्काने राजे झालेले नाहीत तर त्यांना रयतेने राजा बनविले असे आपल्या भाषणात सांगितले.
कार्यक्रमात चिमुकला मुलगा सात्विक निलेश पुपरेड्डीवार शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित मनोगत व्यक्त केले. आरूश्री श्रीकांत गद्देवार, साची साईनाथ बोम्मावार ह्या चिमुकल्या मुलीने प्रेरणादायी गीत सादर केले
या प्रसंगी गानली समाज बहुउद्देशीय मंडळाचे पदाधिकारी, सदस्य व समाज बांधव उपस्थित होते. कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
शेवटी उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे अनुकरण करून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी कार्य करण्याचा संकल्प केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जुगल बोमनवार यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गानली समाज बहु. मंडळचे सर्व पदाधिकारी सहकार्य केले.

22
1661 views

Comment