logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

सिग्नल तोडला तर आजपासून वाहनधारकांना बसणार भुर्दंड शहरातील या सिग्नल्सचा समावेश......


नाशिक : लाल सिग्नल सुरू
असतानाही सुसाट गाडी दामटणाऱ्यांना आजपासून (दि.२०) मात्र चांगलाच भुर्दंड पडणार आहे. शहरातील ४० हून अधिक सिग्नलवरील स्मार्ट नंबरप्लेट रीडर सुरू होणार असल्याने थेट वाहन मालकांच्या मोबाईलवर ई-चलन पाठविले जाणार आहे.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराच्या मुख्य चौकांमध्ये ८०० हून अधिक कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यातील अनेक चौकांत 'रेड लाईट व्हॉयोलेशन डिटेक्शन' (आरएलव्हीडी) आणि ऑटोमॅटिक नंबरप्लेट रिकग्निशन (एएनपीआर) यंत्रणा बसविण्यात आली

सीबीएस

मेहेर चौफुली

जुना गंगापूर नाका

शरणपूर चौकी

तरण तलाव

सांगली बँक

त्र्यंबक नाका

कॅनडा कॉर्नर

एबीबी सर्कल

सीबल हॉटेल

जेहान सर्कल

सिटी सेंटर मॉल

बारदान फाटा

पाईपलाईन रोड

प्रसाद सर्कल

विद्या विकास सर्कल

खडकाळी सिग्नल

गडकरी चौक

नागजी चौक

मुंबई नाका सर्कल

पेठ नाका

काट्या मारुती चौक

सेवा कुंज

मखमलाबाद नाका

ड्रीम कॅसल चौफुली

तारवाला चौफुली

मेरी चौफुली

राऊ हॉटेल

नांदूर नाका

आयटीआय चौक

पपया नर्सरी

समृद्धी टी पॉइंट

महिंद्रा सर्कल

त्रिमूर्ती चौक

विहीतगाव टी पॉइंट

बिटको चौक

सिन्नर फाटा

दत्तमंदिर सिग्नल

मिरची सिग्नल

आहे. ही यंत्रणा स्वयंचलित असून, वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या वाहनांवरील क्रमांक आपोआप रेकॉर्ड होईल. ही

यंत्रणा शुक्रवारपासून (दि.२०) सुरू होत आहे. यासोबतच शहर पोलीसही जुन्या नंबरप्लेट्सच्या वाहनांवर धडक कारवाई करणार आहेत.

139
7813 views

Comment