logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

नासिक मध्ये सिग्नल तोडल्यास थेट इ - चलनाद्वारे दंड

लाल सिग्नल असतानाही सुसाट गाडी दामटणाऱ्यांना आज पासून दिनांक 20 फेब्रुवारी चांगलाच भुर्दंड पडणार आहे शहरातील 40 हून अधिक सिग्नल वरील स्मार्ट नंबर प्लेट रीडर सुरू होणार असल्याने थेट वाहन मालकाच्या मोबाईलवर इ चलन पाठवले जाणार आहे.
स्मार्ट सिटीच्या माध्यमातून शहराच्या मुख्य चौकात 800 ऊन अधिक कॅमेरे बसवण्यात आले आहे यातील अनेक चौकात रेड लाइट व्हायोलेशन डिटेक्शन (आरएलव्हीडी) आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रिकग्रिशन (एएनपिआर) यंत्रणा बसवण्यात आली आहे ही यंत्रणा स्वयंचलित असून वाहतूक नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकाच्या वाहनावरील क्रमांक ऑटोमॅटिक रेकॉर्डिंग होईल ही यंत्रणा शुक्रवारपासून दिनांक 20 फेब्रुवारी सुरू होत आहे यासोबत शहर पोलीसही जुन्या नंबर प्लेटच्या वाहनावर धडक कारवाई करणार आहेत

33
1334 views

Comment