logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आदर्श गाव वाघोलीच्या शिरपेचात मानाचा तुरा; 'माझी वसुंधरा' अभियानात राज्यात प्रथम

शेवगाव (प्रतिनिधी): पर्यावरण संवर्धन आणि ग्रामविकासाच्या क्षेत्रात सातत्याने अग्रेसर राहणाऱ्या आदर्श गाव वाघोली (ता. शेवगाव) ग्रामपंचायतीने पुन्हा एकदा आपल्या यशाचा झेंडा रोखला आहे. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा 'माझी वसुंधरा' अभियानात वाघोली ग्रामपंचायतीने राज्यस्तरावर प्रथम क्रमांकाचा मानाचा पुरस्कार पटकावला आहे.
मुंबई येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात राज्याच्या पर्यावरण मंत्री नामदार श्रीमती पंकजाताई मुंडे यांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारण्यात आला.
वाघोली ग्रामपंचायतीने वृक्षारोपण, सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा वापर आणि जलसंधारणाच्या कामांत आदर्श निर्माण केला आहे. ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग आणि ग्रामपंचायतीचे नियोजनबद्ध कामकाज यामुळेच सलगपणे हे यश मिळत असल्याचे बोलले जात आहे.
पुरस्कार स्वीकारताना ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, सरपंच आणि ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी पंकजाताई मुंडे यांनी वाघोलीच्या विकासकामांचे कौतुक करत, इतर गावांनीही वाघोलीचा आदर्श घ्यावा असे आवाहन केले.
राज्यात प्रथम क्रमांक मिळाल्याची बातमी समजताच वाघोली ग्रामस्थांनी मोठा आनंदोत्सव साजरा केला. "हा पुरस्कार केवळ ग्रामपंचायतीचा नसून प्रत्येक वाघोलीकराच्या कष्टाचे फळ आहे," अशी भावना यावेळी सरपंच आणि ग्रामविकास समितीच्या सदस्यांनी व्यक्त केली.
"वाघोलीने पर्यावरण रक्षणाचे जे मॉडेल उभे केले आहे, ते महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी आहे. शाश्वत विकासाची ही वाटचाल अशीच सुरू राहावी."
— पंकजाताई मुंडे (पर्यावरण मंत्री, महाराष्ट्र राज्य)

57
7837 views

Comment