logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

वैद्यकीय खर्च नाही, काळजी नाही – जन आरोग्य सेवा माझ्या कुटुंबाचा आधार...........!

अमरावती | प्रतिनिधी

महाराष्ट्रातील सर्व नोंदणीकृत व सक्रिय कार्डधारक बांधकाम कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी आयोजित करण्यात आलेल्या विशेष आरोग्य शिबिरास मोठ्या संख्येने प्रतिसाद मिळाला. “वैद्यकीय खर्च नाही, काळजी नाही – जन आरोग्य सेवा माझ्या कुटुंबाचा आधार” या संकल्पनेतून आयोजित या शिबिरात लाभार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

या आरोग्य शिबिरात विविध आजारांवरील तपासण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, आवश्यक औषधांचे मोफत वितरण तसेच शासकीय आरोग्य योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या आरोग्य संरक्षण योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळावा, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरावेळी स्व आशा बहुउद्देशीय संस्था चे संचालक हितेंद्र जी झाडखंडे व सागर नेहरू बेलकर ऑपरेटर तसेच जन आरोग्य सेवा कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी लाभार्थ्यांशी संवाद साधून आरोग्य योजनांचा जास्तीत जास्त लाभ घेण्याचे आवाहन केले.

शिबिरात उपस्थित एकूण 50 लाभार्थ्यांनी शासनाच्या जन आरोग्य सेवेमुळे वैद्यकीय खर्चाची चिंता दूर झाल्याचे सांगितले. अनेक कुटुंबांना प्रथमच तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला व तपासणीची संधी मिळाली.

आयोजकांच्या वतीने सर्व नोंदणीकृत आणि सक्रिय कार्डधारक बांधकाम कामगारांना अशा शिबिरांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेऊन आपले व आपल्या कुटुंबाचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

19
483 views

Comment