logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अमरावती जिल्हा युवक काँग्रेसची तालुका निहाय आढावा बैठक; मनरेगा मजुरीसाठी तीव्र आंदोलन

अमरावती (प्रतिनिधी): भारतीय युवा कांग्रेसच्या अमरावती ग्रामीण जिल्ह्याची तालुका निहाय आढावा बैठक उत्साहात पार पडली. बैठकीत संघटनात्मक बांधणी, प्रलंबित प्रश्न आणि आगामी कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी मनरेगा कामगारांच्या प्रलंबित मजुरीबाबत तीव्र आंदोलन छेडण्यात आले. कामगारांना वेळेवर मजुरी मिळावी, थकित रकमेचे तात्काळ वितरण करावे आणि प्रशासकीय दिरंगाई थांबवावी, अशी ठाम मागणी करण्यात आली. संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत लवकरात लवकर तोडगा काढण्याचा इशाराही देण्यात आला.
बैठकीस व आंदोलनास
मा. राहुल येवले (जिल्हाध्यक्ष, युवक काँग्रेस अमरावती ग्रामीण)
मा. अनिकेत ढेंगळे (कार्यकारी अध्यक्ष), रितेशभाऊ पांडव, परिक्षितभाऊ जगताप, इंजि. नितेशभाऊ वानखडे, उत्कर्षभाऊ देशमुख, सागरभाऊ कलाने, पंकज भाऊ मोरे तसेच इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा. राहुल येवले यांनी सांगितले की, “मनरेगा कामगारांच्या हक्काच्या मजुरीसाठी युवक काँग्रेस रस्त्यावर उतरली आहे. प्रशासनाने तात्काळ निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल.” बैठकीत तालुकानिहाय संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला असून, ग्रामीण भागातील प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवण्याचा निर्णय घेण्यात आला.

37
693 views

Comment