logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

गडचिरोलीच्या पिपरे येथील पेट्रोल पंपावर नागरिकांना त्रास; 100 रुपयांचे पेट्रोल देण्यास टाळाटाळ

गडचिरोलीच्या पिपरे येथील पेट्रोल पंपावर नागरिकांना त्रास; 100 रुपयांचे पेट्रोल देण्यास टाळाटाळ
📍 गडचिरोली | प्रतिनिधी
गडचिरोली तालुक्यातील पिपरे येथील एका पेट्रोल पंपावर नागरिकांना पेट्रोल भरण्यासाठी त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार पुढे आली आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, 100 रुपयांचे पेट्रोल मागितल्यास “चिल्लर असेल तरच पेट्रोल देतो, नाहीतर देणार नाही” असे पंपावरील कर्मचाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तसेच काही वेळा 1-2 नंबरच्या पंपावर पाठवूनही पेट्रोल न भरण्याच्या घटना घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.
यामुळे सामान्य नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत असून, पब्लिक सर्विस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पेट्रोल पंपाकडून योग्य सेवा मिळत नसल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली असून, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

46
1141 views

Comment