logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

काटोल नगरपरिषदेत महिला सफाई मित्र व कर्मचाऱ्यांचा गौरव ​स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० अंतर्गत 'सफाई मित्र सुरक्षा शिबीर' व सत्कार सोहळा संपन्न

काटोल प्रतिनिधी :
स्वच्छ महाराष्ट्र अभियान २.० व स्वच्छ भारत अभियान २.० अंतर्गत जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, काटोल नगरपरिषदेच्या वतीने 'सफाई मित्र सुरक्षा शिबीर' आणि महिला कर्मचारी सत्कार समारंभाचे शानदार आयोजन करण्यात आले. शहराच्या स्वच्छतेत मोलाचे योगदान देणाऱ्या महिला सफाई कामगारांसह विविध विभागांतील महिला कर्मचाऱ्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा मा. अर्चनाताई देशमुख होत्या. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी, उपाध्यक्ष संदीपजी वंजारी, आरोग्य सभापती मा. डॉ. लतेश जोगेकर, सार्वजनिक बांधकाम सभापती मा. गणेश चन्ने, महिला व बालकल्याण सभापती मा. माधुरीताई चरडे, उपसभापती सौ. लताताई कडू यांची प्रमुख उपस्थिती होती.
​या सोहळ्यात नगरपरिषदेच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या सर्व कार्यालयीन महिला कर्मचारी, शिक्षिका तसेच महिला सफाई कामगारांना त्यांच्या उत्कृष्ट सेवेबद्दल प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह व पुष्प देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. महिलांच्या आरोग्यासाठी आणि सुरक्षेसाठी आयोजित 'सफाई मित्र सुरक्षा शिबिरात' त्यांना विविध सोयीसुविधांची माहिती देण्यात आली.
​याप्रसंगी मा. नगरसेविका सुलक्ष्मीताई घोडे, मा. नगरसेविका प्रज्ञाताई डोंगरे, मा. नगरसेविका जयश्रीताई गणेश सावरकर, मा. नगरसेवक भूषणजी भोयर, मा. महेंद्रजी गायकवाड, मा. अमितजी काकडे यांच्यासह नगरपरिषदेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​कार्यक्रमाचे आयोजन आणि यशस्वीतेसाठी शिक्षण, क्रीडा व सांस्कृतिक कार्य सभापती विजय महाजन व त्यांच्या विभागाने विशेष परिश्रम घेतले. महिलांच्या सन्मानाने नगरपरिषद परिसरात उत्साहाचे वातावरण होते.

6
187 views

Comment