logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भवन येथे अवकाळी पावसाचा तडाखा; गव्हाचे पीक जमीनदोस्त, शेतकऱ्याचे लाखोंचे नुकसान

सिल्लोड तालुक्यातील भवन येथे गुरुवारी (१९) रात्री झालेल्या अवकाळी वारे व पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले. भवन शिवारातील गट क्रमांक ६ मधील शेतकरी जगन्नाथ कळम यांचे सुमारे दोन एकर क्षेत्रातील गव्हाचे पीक जोरदार वाऱ्यामुळे पूर्णपणे खाली पडून जमीनदोस्त झाले. त्यामुळे कापणीच्या उंबरठ्यावर असलेल्या पिकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून शेतकऱ्यावर संकट ओढावले आहे. शासनाने पंचनामा करून तातडीने मदत द्यावी, अशी मागणी होत आहे.

0
52 views

Comment