logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

ज्येष्ट नागरीक प्रतिष्ठान नागपूर वतिने शेगाव दर्शनाचा लाभ



उमरेड (प्रतिनिधी )
जेष्ट नागरीक मंडळ नागपूर वतीने २०१९ पासून केंद्रीय दळणवळण मंत्री मा. नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून ज्येष्ट नागरीक व विविध महिला मडळांच्या सदस्यांना ग्रिन बस द्वारे शेगाव व माहूर येथिल तिर्थस्थळाचा लाभ नागपूर येथील नागोबा महिला भजन मंडळ व साथ फॉउन्डेशन, बुट्टेबोरी सदस्यांनी घेतला
सदर ग्रिन बस पर्यावरण पुरक असून ज्येष्ट नागरीक मंडळांचे सचिव डॉ. राजु मिश्रा यांची शेगाव व माहूरगड तिर्थक्षेत्र ची निशुल्क आरामदाही सहल घडवून आणण्यात महत्वाचे सहकार्य लाभत आहे. नागपूर येथील नागोबा महिला भजन मंडळाच्या ४० सदस्यांनी माजी नगरसेविका सौ. रिता अशोक मुळे यांच्या नेतृत्वात शेगाव येथील श्री गजानन महाराज देवस्थान व परिसरातील स्थळाचा पर्यटनांचा लाभ घेतला आहे. तसेच साथ फॉडनेशन, बुट्टेबोरी संचालित स्व. भैय्याजी गुजर पुर्नजन्म आश्रमच्या ३५ सदस्यांनी प्रणय डोंगरे यांच्या उपस्थितीत शेगावच्या श्री गजानन महाराज देवस्थानचा लाभ घेतला आहे. याबाबत जेष्ट नागरीक मंडळाचे त्यांनी आभार मानले आहे. ही सेवा घडवून आणण्यात ग्रिन बस चालक अविनाश झंझोटे, प्रविण थोरात, सचिन मुडहरे यांचे सहकार्य लाभ आहे.

प्रतिक्रिया
प्रणय डोंगरे
साथ फाउन्डेशन, बुट्टेबोरी नागपूर

ज्येष्ट नागरीक प्रतिष्ठत, नागपूर च्या वतिने भैय्याजी गुजर पुर्नजन्म आश्रम, बुट्टेबोरी च्या ३० सदस्यांना शेगाव येथील श्री गजानन महाराज देवस्थान व इतर स्थळे पाहण्याचा योग्य आला असून ही संधी आम्हाला ज्येष्ट नागरीक प्रतिष्ठान नागपूर यांनी उपलब्ध करून दिली. या प्रतिष्ठान सचिन डॉ. राजु मिश्रा यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

0
10 views

Comment