लोणारच्या शिरपेचात मानाचा तुरा: दिपक कायंदे यांना 'छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार २०२६' जाहीर
लोणार (प्रतिनिधी):
आपल्या निस्वार्थ सामाजिक सेवेच्या माध्यमातून जनसामान्यांच्या समस्यांना वाचा फोडणारे आणि NATIONAL ANTI CORRUPTION & OPERATION COMMITTEE OF INDIA
District Chief Youth Protection Buldhana वसा घेतलेले श्री. दिपक शिवाजी कायंदे यांना २०२६ चा प्रतिष्ठित 'छत्रपती शिवाजी महाराज ज्ञानदीप गौरव पुरस्कार' जाहीर करण्यात आला आहे. नाशिक येथील ज्ञानदीप सामाजिक विकास संस्थेच्या वतीने त्यांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात येणार आहे.
विविध क्षेत्रातील कार्याची दखल
दिपक कायंदे यांनी सामाजिक, पत्रकारिता आणि विशेषतः NATIONAL ANTI CORRUPTION & OPERATION COMMITTEE OF INDIA
*District Chief Youth Protection Buldhana* या क्षेत्रात आपले स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यांच्या या निरंतर कार्याची दखल घेऊन संस्थेच्या निवड समितीने त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली आहे. त्यांना हा पुरस्कार सामाजिक रुग्णसेवा या श्रेणीतून प्रदान केला जाणार आहे.
सर्वस्तरातून अभिनंदनाचा वर्षाव
लोणार तालुक्यातील येवती सारख्या ग्रामीण भागातून येऊन राज्य स्तरावर आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या दिपक कायंदे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. या यशाबद्दल त्यांचे मित्रपरिवार, नातेवाईक आणि हितचिंतकांकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अभिनंदन केले जात आहे.