हिदायत पटेल हत्याकांडावरून राजकारण तापले; मुख्य आरोपींसह सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी......
अकोला / मूर्तिजापुर :- महाराष्ट्र काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि प्रदेश उपाध्यक्ष हिदायत पटेल यांच्या बहुचर्चित हत्याकांडातील मुख्य आरोपींसह सर्व आरोपींना लवकरात लवकर अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन आज मूर्तिजापुर शहर पोलिस स्टेशनचे थानेदार अजित जाधव यांना देण्यात आले.
या निवेदनासोबत निजामुद्दीन इंजिनिअर, गुलामहबीब, छोटूमैकेनिकल, मोहम्मद अनीस,मोहम्मद शहाबुद्दीन,सुधीर शेवणे,आदी नागरिक उपस्थित होते. उपस्थितांनी हत्याकांडातील उर्वरित आरोपींना शोधून तातडीने अटक करण्याची व कठोर कारवाई करण्याची मागणी केली.
निवेदन देताना उपस्थितांनी सांगितले की, हिदायत पटेल यांच्या हत्येने संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, न्याय मिळेपर्यंत शांतता भंग होऊ नये यासाठी पोलिस प्रशासनाने त्वरित आणि प्रभावी कारवाई करावी. थानेदार श्री. अजित जाधव यांनी निवेदन स्वीकारले आणि लवकरच योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या प्रकरणी पोलिसांकडून सविस्तर तपास सुरू असल्याचे सांगण्यात आले.