logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

काटोल येथील सीबीएसई शाळेमध्ये शुल्कच्या नावाखाली लूट

काटोल | प्रतिनिधी
दि: 01 एप्रिल 2026
काटोल येथील सीबीएसई शाळेत शैक्षणिक दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून, “शाळा की दुकाने?” असा सवाल पालकांकडून उपस्थित केला जात आहे. विद्यार्थ्यांकडून विविध शुल्कांच्या नावाखाली आकारल्या जाणाऱ्या रकमा, तसेच आवश्यक सुविधा व दर्जेदार शिक्षणाचा अभाव यामुळे पालकांमध्ये नाराजी वाढत आहे.

पालकांचे म्हणणे आहे की, शाळेत मूलभूत सोयी-सुविधा अपुऱ्या असूनही शुल्क मात्र वाढत चालले आहे. काही ठिकाणी शैक्षणिक साहित्य, युनिफॉर्म आणि इतर वस्तू शाळेमार्फतच घेण्याचा दबाव टाकला जात असल्याची तक्रारही समोर आली आहे.

दरम्यान, संबंधित प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेऊन शाळांची तपासणी करावी आणि नियमांचे काटेकोर पालन होईल याची खात्री करावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.

या प्रकरणामुळे शिक्षण क्षेत्रातील व्यापारीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी योग्य ती कारवाई होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.

16
445 views

Comment