logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

तरवाडी फाट्यावर पडलेले झाड तोडून गावकऱ्यांनी मार्ग केला खुला.

तरवाडी फाट्यावर पडलेले झाड तोडून गावकऱ्यांनी मार्ग केला खुला

नांदुरा दि.३ : मागील दोन तीन दिवसांपासून वातावरणात झा-लेल्या बदलामुळे वादळी वारे व पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे नांदुरा - बुलढाणा राज्य महामार्ग २७२ वर वादळी वाऱ्यामुळे तरवाडी फाट्यावर रोडला लागूनच वायकरणा-चे झाड पडल्याने वाहतूकीस अडसर निर्माण झाला होता. अर्थात सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत कुठलीही कारवाई केली नाही. अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे गृहीत धरून व सामाजिक बांधिलकी म्हणून तरवाडी येथील वंचित बहुजन आघाडी

चे कार्यकर्ते भूषण वानखडे यांनी गावकऱ्यांच्या मदतीने झाड तोडून मार्ग खुला केला. गजानन महाले, महादेव वानखडे, सिद्धार्थ वा-नखडे, बाळकृष्ण मुकुंद, अशोक वानखडे इत्यादी गावकऱ्यांनी मदतीचा हात पुढे केला.

12
267 views

Comment