पुणे जिल्हा परिषद: महिला व बालकल्याण सभापती पदी अंकिता पाटील यांची बहुमताने निवड...
इंदापुर
पुणे जिल्हा परिषदेच्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महिला आणि बालकल्याण समितीच्या सभापतीपदी अंकिता पाटील यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेत पार पडलेल्या निवड प्रक्रियेत त्यांनी स्पष्ट बहुमत मिळवत ही जबाबदारी स्वीकारली. त्यांच्या या निवडीमुळे जिल्ह्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून आनंदाचे वातावरण असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे..
महिला व बालकल्याण विभाग हा ग्रामीण भागातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कणा मानला जातो. अंकिता पाटील यांच्या निवडीमुळे या विभागाच्या कामाला नवी गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. प्रामुख्याने ग्रामीण भागातील अंगणवाडी सेविकांचे प्रश्न, महिला बचत गटांचे बळकटीकरण आणि बालकांचे कुपोषण रोखण्यासाठी त्या ठोस उपाययोजना राबवतील, असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे..
अंकिता पाटील निवडीनंतर आपली भूमिका स्पष्ट करताना अंकिता पाटील म्हणाल्या की, "माझ्यावर टाकलेला हा विश्वास मी सार्थ ठरवेन. महिला आणि बालकांच्या प्रश्नांना माझे सर्वोच्च प्राधान्य असेल. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना केवळ कागदावर न राहता त्या समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. विशेषतः बालकांचे शिक्षण, पोषण आणि महिलांची सुरक्षितता या त्रिसूत्रीवर आमचे प्रभावी काम राहील."
अंकिता पाटील यांच्या रूपाने एक अभ्यासू आणि सक्रिय नेतृत्व या समितीला मिळाल्याने, आगामी काळात जिल्हा परिषदेच्या माध्यमातून महिला आणि बालकांसाठी अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवले जाण्याची शक्यता आहे.
#AnkitaPatil #PuneZillaParishad #WomenAndChildWelfare #BreakingNews #MaharashtraPolitics #PuneNews #ZillaParishadUpdate
#SamarthNews #awaajmaharashtracha