logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

भोसरी (पिंपरी चिंचवड) येथे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त रंगणार 'कुस्त्यांचा' आखाडा...


(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त भोसरीत रविवारी रंगणार 'कुस्त्यांचा आखाडा'

पुणे (पिंपरी चिंचवड) भोसरी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त यंदाही विविध कार्यक्रमांमध्ये कुस्त्यांचा आखाडा रंगणार आहे. 'भोजापूर केसरी' किताबासाठी महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर आणि रशियाचा नामवंत पैलवान जुबेर यांच्यात रविवारी (ता. ५) लढत होणार आहे. या लढतीत हर्षवर्धनचा खेळ पाहण्याची क्रिडाप्रेमींमध्ये मोठी उत्सुकता आहे.
कुस्त्यांचे सर्व सामने रविवारी दुपारी ४ वाजता गावजत्रा मैदानावर समाजभूषण वस्ताद सदाशिवराव रामभाऊ फुगे आखाड्यात सुरु होतील. ३० नामवंत पैलवाना कुस्ती स्पर्धेत सहभागी होणार आहेत. कुंडलिक गव्हाणे, जंगली महाराज गव्हाणे आणि पंढरीनाथ गव्हाणे यांच्या स्मरणार्थ 'भोजापूर केसरी' किताबासाठी हर्षवर्धन व रशियाचा पैलवाना जुबेर यांच्यातील लढत प्रमुख असेल. कुशभाऊ लांडगे यांच्या स्मरणार्थ 'भैरवनाथ केसरी' किताबासाठी महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ आणि पृथ्वीराज पाटील यांच्यात लढत होईल.
वस्ताद पोपटराव फुगे, वस्ताद गुलाबराव फुगे आणि वस्ताद परशुराम फुगे यांच्या स्मरणार्थ 'वस्ताद केसरी' किताबासाठी महाराष्ट्र केसरी शुभम शिदनाळे आणि ऑल इंडिया चॅम्पियन रविराज चव्हाण यांच्यात सामना होईल. विठोबा लांडे यांच्या स्मरणार्थ दिल्या जाणाऱ्या पारितोषिकासाठी महाराष्ट्र केसरी वेताळ शेळके आणि उपमहाराष्ट्र केसरी माऊली कोकाटे यांच्यात लढत होईल.
कुस्तीतील महिला खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी लोकप्रतिनिधी भीमा फुगे यांच्या पुढाकाराने निकाली कुस्ती सामाना आयोजित केला आहे. हा सामना पैलवान आर्या बाणेकर आणि हर्षदा मासाळ यांच्यात होणार आहे.

3
313 views

Comment