logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्यमंत्री यांची संवाद चर्चा नाशिकमध्ये संपन्न* .

ए आय एम न्युज प्रतिनिधी शशिकांत भालेराव नाशिक दिनांक 4/4 2026 रोजी रोजीदु. 12.00 वा. राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा संवाद दौरा नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे आयोजित करण्यात आला होता या संवाद दौऱ्याचे कारण म्हणजे नाशिक जिल्ह्यातील जमिनीच्या संदर्भातील तक्रारीचा आढावा घेऊन त्याचे जागेवर निवारण व्हावे यासाठी ही संवाद चर्चा आयोजित केली होती या चर्चेमध्ये नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी बांधव आपल्या रस्त्याच्या व शेतीतील अनेक प्रकारच्या समस्यांचे तक्रारींचे निवारण व्हावे व न्याय मिळावा यासाठी मोठ्या प्रमाणात काल जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्री यांना निवेदन देण्यात आले निवेदन स्वीकारताना अनेक शेतकऱ्यांनी समस्या सांगितल्या यावर लवकरात लवकर त्या समस्याचे निराकरण करण्याचा विश्वास मंत्री महोदयांनी निवेदन स्वीकारताना सांगितले. शेतकऱ्यांना आपले अवजारे घेऊन शेतात येण्या जाण्यासाठी जमिनीची मशागत करण्यासाठी ज्या शेतकऱ्यांना रस्ता नसेल त्यांना त्वरित रस्ता करून देण्यात यावा तसे आदेश व सुचना जिल्हाधिकारी यांना देण्यात येवुन तसेच शेतातील रस्त्याचा शासनाच्या निर्णयाची त्वरित अंमल बजावणी करण्याचे महसूल मंत्री बावनकुळे यांनी सूचना व आदेश दिले. या संवाद दौऱ्याला दादा भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य तसेच नरहरी झिरवाळ अन्न व औषध प्रशासन मंत्री महाराष्ट्र राज्य आमदार दिलीप बनकर आमदार सरोज अहिरे राष्ट्रवादी अजित पवार गट माजी खासदार हेमंत आप्पा गोडसे शिवसेना एकनाथ शिंदे प्रवीण गेडाम नाशिक विभाग महसूल आयुक्त आयुष प्रसाद नाशिक जिल्हाधिकारी सुनील बच्छाव भाजप जिल्हाध्यक्ष नाशिक मालेगाव महिला आघाडी अध्यक्ष प्रतीक्षा भोसले तसेच भाजपचे पदाधिकारी व जिल्ह्यातील सर्व महसूल अधिकारी वर्ग पोलीस अधिकारी या संवाद दौऱ्यासाठी उपस्थित होते.

23
52 views

Comment