logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

" महाराष्ट्र राज्यात दिनांक 01 एप्रिल 2026 पासुन मनरेगा ची कामे 100% बंद आंदोलन , ग्रामरोजगार सेवक सहाय्यक आणि गरीब गरजु मजुरांवर उपासमारीची वेळ . "


महाराष्ट्र राज्यात मनरेगा ची कामे ग्राउंड लेवलवर अंमलबजावणी करणाऱ्या ग्रामरोजगार सहाय्यकांना आजदिनांकपर्यंत महाराष्ट्रराज्य शासन निर्णयानुसार त्यांची कामे अर्धवेळ स्वरूपाची आहेत शासननिर्णय दिनांक 02 मे 2011 प्रमाणे त्यामध्ये स्पष्ट वर्णन केलेले आहे की , ग्रामरोजगार सेवक सहाय्यक हे पद अर्धवेळ स्वरूपाचे आहे, हे काम करून त्यांनी ग्रामरोजगार सेवक सहाय्यकांनी त्यांची व त्यांचे कुटूंबाची उपजिवीका चालविण्यासाठी इतर दुसरे काम करावे .
" ग्रामरोजगार सेवक पदाच्या मानधनातुन त्यांची किंवा त्यांच्या कुटूंबाची उपजिवीका चालेल अशी अपेक्षा त्याने धरू नये . ग्रामरोजगार सेवकाचे उत्पन्नाचे अन्य मार्ग असल्यास ते करून ग्रामरोजगार सेवक पदाचे काम करण्यास मुभा राहील. ग्रामरोजगार सेवक पदाचे हे मानधन त्याचे अधिकचे उत्पन्न असेल, ग्रामरोजगार सेवकाची सेवा तात्पुरत्या स्वरूपाची असेल. ते राज्यशासन / जिल्हापरिषद / पंचायत समितीचे कर्मचारी नसतील तसेच ते ग्रामपंचायतीचेही नियमीत कर्मचारी नसतील . " असे स्पष्ट लिहलेले आहे महाराष्ट्रराज्य शासन निर्णय दिनांक 02 मे 2011 च्या शासन निर्णयामध्ये .

असे असतांना महाराष्ट्रराज्य सरकारने दिनांक 01 एप्रिल 2026 रोजीपासुन केंद्रसरकार च्या आदेशाने ग्रामरोजगार सेवक सहाय्यकांना पुर्णवेळ काम करण्यासाठी आदेश दिले आहेत .
" जसे की मनरेगा च्या कामांवरील मजुरांची सकाळी एकदा आणि संध्याकाळपर्यंत पुन्हा दुसऱ्यांदा कामावरील मजुरांची फेसऑथिंटीकेशन करून ऑनलाईन हजेरी घेणे . "

महाराष्ट्रराज्य शासन निर्णयात ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना पुर्णवेळचा दर्जा न देताच त्यांना -
1) पुर्णवेळ काम करा असे निर्देश देण्यात आलेले आहेत ,
2) मनरेगा कामांवरील मजुरांची दिवसाला दोन वेळा सकाळी काम सुरू झालेवर आणि संध्याकाळी ऑनलाईन फेसऑथिंटीकेशन करून हजेरी घेण्यात यावी ,
3) मनरेगा कामांवरील मजुरांची दिवसातुन दोन वेळा ऑनलाईन हजेरी घेण्यासाठी ग्रामरोजगार सेवक सहाय्यकांना मोबाईल डाटा चा खर्च सरकार देणार नाही तो खर्च ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांनी त्यांचे घरून करावा ,
4) ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना मनरेगा योजना सन 2005 पासुन तहसील कार्यालय, पंचायत समीती कार्यालय ठिकाणी येणे जाणे साठी टिए डीए , कोणत्याही प्रकारचा स्टेशनरीखर्च आजदिनांकपर्यंत महाराष्ट्र राज्यात ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना देण्यातच आलेला नाही .

अशी परिस्थिती असतांना ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना कोणत्याही प्रकारचा खर्च न देता केवळ " गुलामासारखे " वरिष्ठांमार्फत निर्देश देण्यात येवून कामे करण्यासाठी आदेश देण्यात येत आहेत आणि काम करायला लावीत आहेत .

परंतु दिनांक 01 एप्रिल 2026 रोजीपासुन संपुर्ण महाराष्ट्र राज्यातील ग्रामरोजगार सेवक सहाय्यकांनी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केलेले आहे त्यामधील मागणी -
1) ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना दिनांक 02 मे 2011 च्या महाराष्ट्रराज्य शासन निर्णयातील अर्धवेळ असलेला ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना पुर्णवेळ करणेसाठी शासन निर्णय काढण्यात यावा ,
2) दिनांक 03 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्रराज्य शासनाने ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना मानधन वितरीत करण्याबाबत च्या शासन निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी करून त्याप्रमाणे मानधन तात्काळ वितरीत करण्यात यावे ,
3) ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना मनरेगा च्या कामावरील मजुरांची दिवसातुन दोनवेळा ऑनलाईन फेसऑथिंटिकेशन द्वारे हजेरी घेण्याकरीता मोबाईल डाटा रिचार्जसाठी खर्च देण्यात यावा व स्टेशनरीखर्च देण्यात यावा ,
4) तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालयाचे ठिकाणी येण्या जाण्यासाठी टीए डीए देण्यात यावा .

अन्यथा याबाबींसाठी संपुर्ण महाराष्ट्रराज्यातील ग्रामरोजगार सेवक सहाय्यकांनी दिनांक 01 एप्रिल 2026 रोजीपासुन सुरू केलेले काम बंद आंदोलन सुरूच राहील .
या परिस्थितीमुळे गरीब गरजु मजुरांना मिळणारे काम बंद झालेमुळे महाराष्ट्रराज्य सरकारच्या धोरणामुळे राज्यातील गरीब गरजु मजुरांवर उपासमारीची वेळ आणलेली आहे .

महाराष्ट्रराज्य सरकारचे धोरण असे की आम्ही कोणत्याच प्रकारचा खर्च देणार नाही , शासन निर्णयाची अंमलबजावणी करणार नाही , परंतु कामे सुरळीत सुरू ठेवा म्हणजेच गुलामासारखे जे काम सांगीतले ते काम करा , आपल्या हक्काची मागणी करू नका . ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना मिनीमम वेजेस प्रमाणे मजुरी तरी सरकारने देणे अपेक्षित असतांना तेवढे सुद्धा त्यांना महाराष्ट्रराज्य सरकार देत नाही .
देशातील इतर राज्यांमध्ये तेथील राज्यसरकार ने ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांना पुर्ण वेळचा दर्जा दिलेला आहे म्हणुन तेथील ग्रामरोजगार सेवक सहाय्यक योग्य काम करीत आहेत . परंतु महाराष्ट्र राज्यात ग्रामरोजगार सेवक सहाय्यकांना अर्धवेळ म्हणुन त्यांचेकडुन गुलामांसारखे पुर्णवेळ काम करून घेतल्या जात आहे . म्हणून मनरेगा ग्रामरोजगार सेवक सहाय्यक आणि मनरेगा मजुरांवर उपासमारीची वेळ आलेली आहे .

केंद्रसरकारने आणि महाराष्ट्रराज्य सरकारने या परिस्थितीवर तात्काळ लक्ष देऊन परिस्थितीचा गांभिर्याने विचार करावा व न्याय देण्यात यावा ही ग्रामरोजगार सेवक सहाय्यक महाराष्ट्रराज्य यांची मागणी आहे . देशातील सर्व सक्षम न्यायालयांनी सुद्धा यावर जनहितार्थ विचार करावा की देशात ग्रामरोजगार सेवक सहाय्यक यांचेकडुन कसे काम करवुन घेतले जात आहे , किती वेळ काम करवून घेतले जात आहे आणि मजुरी स्वरूपात त्यांना राज्यसरकार कडुन काय दिले जात आहे .

107
3802 views

Comment