केज तहसीलदार यांचे अपघाती निधन.
AIMA news
तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी कार अपघातात दुर्दैवी निधन
केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे आज सकाळी लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात निधन झाले. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला आहे. गिड्डे हे मूळचे सांगलीचे होते आणि केज इथे ते तहसीलदार म्हणून कार्यरत होते.
शेतकरी कुटुंबात जन्म, २०१९ ला तहसीलदार; वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी सांगलीच्या सुपुत्राचा दुर्दैवी निधन. तहसिलदार राकेश गिड्डे यांचं वयाच्या अवघ्या ३१ व्या वर्षी अकाली निधनामुळे प्रशासनासह सांगलीत शोककळा पसरलीय.