सैलानी यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल ठाणेदार निलेश सोळंकी व पोलीस पथकाचा भव्य नागरी सत्कार
सैलानी यात्रा शांततेत पार पडल्याबद्दल ठाणेदार निलेश सोळंकी व पोलीस पथकाचा भव्य नागरी सत्कार
सैलानी (बुलढाणा): सादिक शाह उपाध्यक्ष बुलढाणा
ऑल इंडिया मीडिया न्यूज नेटवर्क
प्रसिद्ध सैलानी बाबा यात्रा यंदा अत्यंत शांततेत, सुरक्षित आणि नियोजनबद्धरीतीने पार पडली. या यशाचे मुख्य शिल्पकार ठरलेले कर्तव्यदक्ष ठाणेदार निलेश सोळंकी आणि त्यांच्या संपूर्ण पोलीस पथकाचा सैलानी येथील ग्रामस्थ, व्यापारी आणि विविध संघटनांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.
दिवस-रात्र सेवा आणि चोख बंदोबस्त
यात्रेच्या कालावधीत ठाणेदार सोळंकी आणि त्यांचे कर्मचारी आपले घरदार सोडून दिवस-रात्र सैलानी येथे मुक्कामी होते. गर्दीचे व्यवस्थापन, वाहतूक कोंडीवर नियंत्रण आणि भाविकांची सुरक्षा यासाठी त्यांनी केलेले सूक्ष्म नियोजन वाखाणण्याजोगे ठरले. त्यांच्या या तत्परतेमुळेच कोणतीही अनुचित घटना न घडता यात्रा निर्विघ्न पार पडली.
"मुहब्बत, इंसानियत, सुरक्षा और भरोसे का दूसरा नाम यानी ठाणेदार निलेश सोळंकी साहेब!" अशा शब्दांत ग्रामस्थांनी त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
प्रमुख उपस्थितांच्या हस्ते गौरव
सैलानी येथील मुजावर परिवार, व्यापारी वर्ग, ग्रामपंचायत पिंपळगाव सराई आणि मन्नत फाऊंडेशनच्या वतीने हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ठाणेदार सोळंकी यांच्यासह:
दुय्यम ठाणेदार: पाटील साहेब
पोलीस अधिकारी: राहुल जाधव, अख्तर साहेब, कळमकर साहेब
बीट जमादार: खार्डे साहेब, काजी साहेब, सागर कोरडे व इतर कर्मचाऱ्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला.
यांनी मानले आभार
सामाजिक कार्यकर्ते गुड्डू शेख आणि मन्नत फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष शेख साजेद शेख फारुक मुजावर यांनी पोलिसांच्या सहकार्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार मानले.
याप्रसंगी सरपंच पती केशव पाटील तरमळे, शेख चांद मुजावर, शेख शफीक मुजावर, शेख हारून, शेख शकील जमीनदार, सांडू इंगळे, अकिल पत्रकार, संदीप गवते, पवन शेवाळे, रशीद मुजावर, सलीम पठाण, फहीम शाह, दलबीर सिंह, बाबा सिंह, सुनील मामा, मदन धंदर, दत्ता मापारी आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ व व्यापारी उपस्थित होते.