logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

शिरूर ताजबंद जि . लातूर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान संपन्न .

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात शिरुर ताजबंद येथे १५३८ प्रमाण पत्र वाटप .
अभियानातून नागरिकांच्या समस्या सुटतील सभापती सुरजभैय्या बाबा साहेब पाटील .
लातूर जिल्हयातील शिरुर ताजबंद येथे शिरूर ताजबंद मंडळात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात लाभार्थ्यांना १५३८ प्रमाणपत्र उपजिल्हा अधिकारी डाॅ.मंजूषा लटपटे ,तहसिलदार सौ.उज्वला पांगरकर , लातूर जिल्हा परिषद समाज कल्याण सभापती उत्तमराव माने,अहमदपूर पंचायत समिती सभापती सुरजभैय्या बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत वाटप करण्यात आले.अभियानातून नागरिकांच्या समस्या सुटतील असे सभापती सुरजभैय्या बाबासाहेब पाटील यांनी भावना व्यक्त केल्या.
प्रमुख पाहुणे म्हणुन कृषी अधिकारी बावगे, कुमठा पंचायत समिती सदस्य कृष्णराज भोसले,वळसंगी पंचायत समिती रविंद्र बोडके,मुख्याध्यापक दिपक भराटे,सरपंच मच्छिंद्र वाघमारे,चेअरमन राजकुमार सोमवंशी , सामाजिक कार्यकर्ते बालाजी पडोळे,पोलीस पाटील उत्तम वाघमारे, कृषी सहाय्यक शिंदे, सुरवसे देशपांडे मॅडम उपस्थित होते.
महा राजस्व अभियानात मंडळ अधिकारी / ग्राममहसुल अधिकारी डिजीटल ७/१२,८अ वाटप,७/१२ दुरुस्ती ,प्रलंबित फेरफार निकाली काढणे,प्रमाणपत्र वाटप विभाग,नविन आधार कार्ड किढणे व दुरुस्ती विभाग,संजय गांधी निराधार योजना व पुरवठा विभाग,तक्रारी अर्ज स्विकारणे,महीला बचत गट विभाग,आरोग्य विभाग,पंचायत समिती विभाग,कृषी विभाग,भूमी अभिलेख विभाग असे दहा प्रकारचे स्टाॅल लावण्यात येवून तेथे अर्ज स्विकारुन ७/१३ ,८अ ,संजय गांधी निराधार योजना,फेरफार निकाली ७/१२ दुरुस्ती,७/१२ वाटप,८अ वाटप,एक खिडकी अंतर्गत निकालु काढलेले अर्ज असे एकुण १५३८ प्रमाणपत्र वाटप करण्यात आले.
———चौकट---------
शेत रस्ता अडवणार्‍यांची गय केली जाणार नसून शेतकर्‍यांना कोणत्याही परिस्थितीत रस्ता खुला करुन देण्यात येईल ,याकामासाठी नागरिकांनी तहसिलदार उज्वला पांगरकर यांना भेटून लेखी निवेदन द्या.शिरुर ताजबंद येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानात अहमदपूर तालुक्यातील सर्व विभागाचे प्रमुख अधिकारी ,व कर्मचारी उपस्थित असून या अभियानां अतर्गत नागरिकांना कमी वेळेत विविध योजनांची माहीती मिळून लाभ घेता येईल असे उपविभागीय अधिकारी डाॅ.मंजूषा लटपटे यांनी सांगीतले.
—————————————————
यावेळी तहसिलदार उज्वला पांगरकर यांनी अभियानाची माहीती सांगीतली,सभापती सुरजभैय्या बाबासाहेब पाटील ,चेअरमन राजकुमार सोमवंशी यांनी आपले मत व्यक्त केले.
मंडळ विभाग शिरुर ताजबंद ग्राम महसुलअधिकारी व्ही.बी. कांचे ,शिरुर ताजबंद ग्राम महसुलअधिकारी -१ जि.डि. इंगोले ,शिरुर ताजबंद ग्राम महसुलअधिकारी-२ एस. एस. थोरात ,आजनी ग्राम महसुल अधिकारी एम. व्ही ,जोशी ,उमरगा कोर्ट ग्राम महसुलअधिकारी एम. के.पाटील,वायगाव ग्राम महसुलअधिकारी डी.डी.तेली,
नांदुरा (बु) ग्राम महसुलअधिकारी एम.बी.माशाळे २ राजकुमार कांबळे, सिद्धू कांबळे, अमर पडोळे, सचिन मळे, नागेश आदींनी अभियानाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले. सुत्रसंचलन माधव माने आभार एम.वि.जोशी यांनी आभार मानले.

266
5584 views

Comment