जगदंबा प्रतिष्ठान तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात
जगदंब प्रतिष्ठान तर्फे क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले जयंतीनिमित्त मुक बधिर निवासी शाळा,सावनेर येथे महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून शालेय साहित्य वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्ते मंगेश चरपे होते.प्रमुख पाहुणे म्हणून युवा मोर्चा अध्यक्ष पिंटू सातपुते, जगदंब प्रतिष्ठान चे शुभम बनकर, हिमांशू चाफेकर, अभिषेक सातपुते, सुनिल वाडबुधे, कुणाल गायधने, प्रतीक बनाईत, नुकुल सातपुते, प्रज्वल कांबळे, जय सातपुते आर्यन बावने. व इतर सामाजिक संस्था उपस्थित होत्या.व यावेळी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक वर्ग उपस्थित राहुन आयोजकाचे सर्व शिक्षकांनी आभार व्यक्त केले.