कुडाशी परिसरात पाणीटंचाई – महिलांचे हाल, नागरिकांची पाण्यासाठी धडपड
कुडाशी परिसरातील आंबापाडा येथे गेल्या अनेक दिवसांपासून पाण्याचे पाईप फुटल्यामुळे महिलांना या समस्येचा मोठा फटका बसत असून त्यांना दररोज पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे.
स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावातील पाण्याचे पाईप फुटल्यामुळे . पिण्याच्या पाण्याची तीव्र कमतरता भासत असल्यामुळे महिलांना व नागरिकांना चारचाकी, दुचाकी तसेच स्कुटरच्या मदतीने दूरच्या खिरणीपाडा येथून पाणी आणावे लागत आहे. अनेक महिला स्कुटरवरून पाण्याच्या बदल्या भरून आणताना दिसत असून हा प्रवास कष्टदायक आणि वेळखाऊ ठरत आहे.
दररोजच्या या संघर्षामुळे महिलांचे हाल होत असून घरगुती कामे, शेतीची कामे आणि मुलांची काळजी यामध्ये मोठा अडथळा निर्माण होत आहे. पाईप लाईन लवकर दुरुस्त करावी मागणी करण्यात आली आहे.