logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

फार्मर आयडी विना खत वितरण होणार नाही*



*शेतकऱ्यांनी तात्काळ नोंदणी करावी*

नांदेड दि. 15 एप्रिल :- केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार रासायनिक खतांच्या वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी फार्मर आयडी (Farmer ID) प्रणाली लागू करण्यात येत आहे. यानुसार, फार्मर आयडी विना कोणत्याही शेतकऱ्याला खत मिळणार नाही. जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांनी शासनाच्या या उपक्रमास सहकार्य करून फार्मर आयडी नोंदणी तात्काळ पूर्ण करावी, जेणेकरून खत वितरण सुरळीत व पारदर्शक पद्धतीने होऊ शकेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दतकुमार कळसाईत यांनी केले आहे..

*फार्मर आयडी अनिवार्य*
शेतकऱ्यांनी खत खरेदीसाठी फार्मर आयडी काढणे बंधनकारक आहे. आयडी शिवाय खत वितरण केले जाणार नाही.

*अनुदानित खतांसाठी सक्ती*
रासायनिक खतांवरील अनुदानाचा लाभ घेण्यासाठी फार्मर आयडी आवश्यक आहे.

*काळाबाजार व लिंकिंग थांबवणे*
खतांचा काळाबाजार व अनावश्यक लिंकिंग रोखण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरेल. पारदर्शक व नियोजनबद्ध वितरण सुनिश्चित होईल.

*डिजिटल नोंदणी प्रणाली*
शेतकऱ्यांची माहिती (जमीन, पीक, योजना) डिजिटल स्वरूपात नोंदवली जाईल. खत खरेदी करताना आयडी स्कॅन/क्रमांक वापरला जाईल.

*थेट लाभ हस्तांतरण (DBT)*
खत अनुदान थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होईल. इतर शासकीय योजनांसाठीही फार्मर आयडी आवश्यक राहील. जिल्ह्यात फार्मर आयडी नोंदणी मोहिम सुरू आहे. सर्व तालुक्यांमध्ये जनजागृती व नोंदणी शिबिरे आयोजित करण्यात येत आहे

*फार्मर आयडी कसा काढावा ?*
ग्रामपंचायत कार्यालय. सीएससी CSC (कॉमन सर्व्हिस सेंटर). सहाय्यक कृषी अधिकारी / कृषी विभाग कार्यालय

*महत्वाच्या सूचना*
शेतकऱ्यांनी तात्काळ फार्मर आयडी नोंदणी पूर्ण करावी. खत खरेदी करताना आयडी सोबत ठेवावा. अधिकृत विक्रेत्याकडूनच खत खरेदी करावी व बिल घ्यावे. खरीप हंगाम 2026 पासून हा नियम काटेकोरपणे लागू केला जाणार आहे. सहकारी संस्था व खाजगी विक्रेत्यांमार्फतही याच नियमांनुसार खत वितरण होईल, असेही आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तकुमार कळसाईत यांनी केले आहे.

2
557 views

Comment