logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे 'मुक्ताविष्कार' शिबिर व दहावी पायाभूत वर्गांचे शानदार उद्घाटन



​विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव आणि शैक्षणिक प्रगतीसाठी अभिनव उपक्रम



​पिंपळगाव सराई (प्रतिनिधी):

येथील शिक्षण प्रसारक मंडळ संचलित जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे उन्हाळी सुटीचा सदुपयोग करण्याच्या उद्देशाने 'मुक्ताविष्कार' छंद शिबिर आणि आगामी शैक्षणिक वर्षाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या अशा इयत्ता दहावी पायाभूत (Foundation) वर्ग दिनांक 23/04/2026 ते 30/04/2026 दरम्यान आयोजित केले आहे अशा कार्यक्रमाचे उद्घाटन आज अत्यंत उत्साहात पार पडले. या दुहेरी उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

​कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य प्रमोद ठोंबरे होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक संजय पिवटे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून शिबिराचे अधिकृत उद्घाटन करण्यात आले. व्यासपीठावर प्रमुख मार्गदर्शक म्हणून रवींद्र खानंदे आणि विकास गवई यांची उपस्थिती होती.

​'कला आणि अभ्यासाचा सुवर्णसंगम'

​अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रमोद ठोंबरे यांनी शिबिराचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, "मुक्ताविष्कार शिबिर हे केवळ विरंगुळा नसून मुलांच्या सुप्त कलागुणांना वाव देणारे एक व्यासपीठ आहे. त्याचबरोबर, दहावी हे विद्यार्थ्यांच्या जीवनातील महत्त्वाचे वळण असल्याने, पायाभूत वर्गांमुळे त्यांचा अभ्यासाचा पाया आतापासूनच भक्कम होईल आणि यशाची वाटचाल सुकर होईल."

​पर्यवेक्षक संजय पिवटे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, "उन्हाळी छंद वर्ग विद्यार्थ्यांना सृजनशीलतेची नवी दिशा देतील. दहावीच्या विद्यार्थ्यांनी या पायाभूत वर्गांचा लाभ घेतल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास नक्कीच वृद्धिंगत होईल."

​'मुक्ताविष्कार' शिबिरामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विषयांचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने:

​योगशिक्षण: शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी.

​चित्रकला व संगीत: सर्जनशीलता जोपासण्यासाठी.

​कार्यानुभव: हातातील कौशल्यांचा विकास करण्यासाठी.

​व्यक्तीमत्त्व विकास: संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास वाढवण्यासाठी.

​या उपक्रमासाठी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मा. श्री.रामकृष्ण दादा शेटे, सचिव मा. श्री. प्रेमराजजी भाला, सर्व संचालक मंडळ तथा सल्लागार समिती सदस्यांचे विशेष प्रोत्साहन व मार्गदर्शन लाभले. विद्यालयातील सर्व शिक्षक वृंदाने या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

​कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन आणि उपस्थितांचे आभार सुदाम चंद्रे यांनी मानले. या उद्घाटन सोहळ्याला विद्यार्थ्यांची व पालकांची अभूतपूर्व उपस्थिती लाभली होती. शिबिर आणि अभ्यासाच्या या अनोख्या संगमामुळे पिंपळगाव सराई परिसरात विद्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

29
5256 views

Comment