logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

धडाडीचे समाजसेवक प्रविण वाघ यांना राज्यस्तरीय 'आदर्श समाज रत्न' पुरस्कार जाहीर

धडाडीचे समाजसेवक प्रविण वाघ यांना राज्यस्तरीय 'आदर्श समाज रत्न' पुरस्कार जाहीर
गोंदेगावसह सोयगाव तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; १७ मे रोजी पुण्यात होणार गौरव
बुलढाणा (प्रतिनिधी): सादिक शाह

आपली गरिबी आणि परिस्थितीवर मात करत समाजसेवेचा वसा जोपासणारे, जय संघर्ष ग्रुपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्रविण वाघ यांना पुणे येथील 'राष्ट्रभक्ती' (विजेता मीडिया) संस्थेच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठित 'राज्यस्तरीय आदर्श समाज रत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्या या निवडीमुळे सोयगाव तालुक्यातील गोंदेगाव परिसरात आणि जय संघर्ष ग्रुपमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
वाहन चालक ते प्रदेशाध्यक्ष: एक प्रेरणादायी प्रवास
प्रविण वाघ हे अत्यंत सामान्य कुटुंबातील असून, वाहन चालक म्हणून काम करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. मात्र, कष्टप्रद आयुष्य जगत असतानाही त्यांनी सामाजिक बांधिलकी कधीही सोडली नाही. 'जय संघर्ष वाहन चालक सामाजिक संस्थे'चे संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांनी वाघ यांची जिद्द ओळखून त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या जोरावर केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर इतर राज्यांतही संघटनेचे जाळे विणले आहे.
उल्लेखनीय सामाजिक कार्य:
अपघातग्रस्तांना मदत: रस्त्यावरील अपघातावेळी तातडीने धावून जाणे आणि बिघडलेल्या वाहनांना मदत करणे यात प्रविण वाघ नेहमीच अग्रेसर असतात.
ऐतिहासिक आंदोलने: 'हिट अँड रन' कायद्याविरोधात देशातील पहिला मोर्चा काढण्याचे धाडस त्यांनी दाखवले.
प्रबोधन आणि शिक्षण: गोंदेगाव येथे हजारो विद्यार्थ्यांना वाहतुकीचे नियम शिकवून रस्ते सुरक्षा शिबिरे आयोजित केली. तसेच जिल्हा परिषद शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांना वेळोवेळी प्रोत्साहन दिले.
पर्यावरण रक्षण: स्वतःच्या व मित्रांच्या वाढदिवसानिमित्त स्मशानभूमी आणि शाळा परिसरात वृक्षारोपण करून केवळ झाडे लावलीच नाहीत, तर ती जगवून मोठी केली.
नागरी समस्यांचा लढा: गावातील विजेच्या प्रश्नासाठी स्वाक्षरी मोहीम राबवणे असो किंवा घाटनांद्रा घाटातील ढगफुटीनंतर रस्ता दुरुस्तीसाठी प्रशासनाला भाग पाडणे असो, वाघ यांनी नेहमीच आक्रमक भूमिका घेतली आहे.
"खरोखरच समाजाप्रती आणि देशाप्रती असलेली प्रविण वाघ यांची निष्ठा पाहून, एका सामान्य पत्र्याच्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या कार्याची दखल आम्ही घेतली आहे. त्यांच्या कार्याचा गौरव करताना आम्हाला अभिमान वाटतो."
सुनील गोरे (संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रभक्ती परिवार)
पुरस्कार वितरण सोहळा
दरवर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 'राष्ट्रभक्ती' संस्था अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करत असते. यंदाचा हा दिमाखदार सोहळा १७ मे रोजी पुणे येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. या पुरस्काराबद्दल प्रविण वाघ यांच्यावर सर्वच स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

8
786 views

Comment