logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

राज्यस्तरीय अजिंक्यपद स्पर्धेकरिता वेलगूरचे खेळाडू रवाना

राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धेकरिता वेलगुरचे खेळाडू रवाना
महाराष्ट्र राज्य आंतरविभागीय 14 वर्षाखालील व्हॉलीबॉल अजिंक्यपद स्पर्धा मोजा नरसोबाची वाडी बारामती जिल्हा पुणे येथे दिनांक 22 ते 24 मे 2026 दरम्यान आयोजित करण्यात येत आहे या स्पर्धेसाठी नागपूर विभागीय संघाची निवड चाचणी दिनांक 10 मे 2026 रोजी समर्थ व्यायाम शाळा प्रताप नगर नागपूर येथे आयोजित करण्यात आली होती यामध्ये वेलगुर येथील सात खेळाडूंनी सहभाग घेतला होता यापैकी कु.सौरव तानाजी मराठे व सनम दीपक राऊत राजे धर्मराव हायस्कूल वेलगुरचे विद्यार्थी यांची नागपूर विभागीय संघात निवड करण्यात आली. महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना गडचिरोलीचे सचिव श्री सतीश पवार सर श्री अमित शेंडे सर व्यवस्थापक श्री प्राध्यापक घोडमारे सर प्रमुख मार्गदर्शक यांची मुलाचे मार्गदर्शन लाभले तसेच वेलबुर सारख्या दुर्गम व आदिवासी भागातील हे दोन खेळाडू राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धेमध्ये आपली चमकदार कामगिरी दाखवण्यासाठी दिनांक 21 मे 2026 ला नागपूर येथून रवाना झाले. या खेळाडूंना ब्लू स्टार क्लब वेलगूर, न्यू स्टार क्लब वेलगुर व अजय कंकडालवार माझी जि प अध्यक्ष गडचिरोली यांनी मोलाचे आर्थिक सहकार्य केले. खेळाडूंची निवड याव्य व्हावी यासाठी विलगूर येथील श्री मार्गदर्शक प्रशिक्षक श्री यशोधन गजभिये यांनी अथक परिश्रम घेऊन खेळाडूंना घडवले. वेलगुर वासिया तसेच अहेरी तालुका वासिया गडचिरोली जिल्ह्यावासिय व महाराष्ट्र व्हॉलीबॉल संघटना गडचिरोली तर्फे खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय अजिंक्य पद स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या

71
7838 views

Comment