logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

चिखली(मैना) येथे पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 अंतर्गत कृषी मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न...!


काटोल प्रतिनिधी:-
काटोल तालुक्यातील चिखली (मैना) येथे कृषी तज्ञ मा. श्री. कृष्णाजी डफरे यांच्या शेतात पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 स्पर्धेच्या अनुषंगाने शेतकऱ्यांसाठी विशेष कृषी मार्गदर्शन व प्रात्यक्षिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले
या कार्यक्रमात दशपर्णी अर्क निर्मिती, जीवामृत तयार करण्याची पद्धत, बियाण्यांची उगवण क्षमता तपासणी तसेच बीज प्रक्रिया याविषयी सविस्तर प्रात्यक्षिक करून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. आधुनिक व सेंद्रिय शेती पद्धतींचा अवलंब करून उत्पादन खर्च कमी व उत्पादन वाढ कशी साधता येईल याबाबत माहिती देण्यात आली.
यावेळी कृषी विभागाचे सर्कल अधिकारी मा. चरपे सर, उमेद अभियानाचे हेलोंडे सर, कृषी सहाय्यक दीपिका मॅडम, कृषी सहाय्यक मिलमिले सर तसेच पाणी फाउंडेशनचे सचिन सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास गावातील कृषी तज्ञ मा. श्री. कृष्णाजी डफरे, दीपक दुपारे, बाबाराव डफरे, प्रफुल नारनवरे, रमेश दुपारे, दिलीप दुपारे, सुनील डफरे, विकास सोमकुवर, सुशांत परिपगारे तसेच महिला शेतकरी ताईबाई सोमकुवर, शीलाबाई शेंडे, पुष्पाबाई गोंडाणे, मीनाक्षी पाटील आणि गावातील युवा शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये सेंद्रिय शेतीविषयी जागरूकता निर्माण झाली असून पाणी फाउंडेशन फार्मर कप 2026 स्पर्धेसाठी शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

73
2142 views

Comment