माजी IPS अधिकाऱ्याच्या पत्नीची घरातच निर्घृण हत्या; पुण्यातून मुख्य आरोपी मोलकरणीला अटक!
Reporter - Prakash Ingle
विश्वासू नोकरावर ठेवलेला आंधळा विश्वास एका कुटुंबासाठी अत्यंत जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हैदराबाद येथील माजी पोलीस महासंचालक (DGP) विनय रंजन रे यांच्या निवासस्थानी त्यांच्या पत्नी तनुजा रंजन यांची गळा दाबून आणि क्रूर छळ करून हत्या करण्यात आली आहे.