logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

आंबेनळी घाटात भीषण अपघात; स्कॉर्पिओ तब्बल 1800 फूट दरीत कोसळली

महाबळेश्वर–पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटात मध्यरात्री भीषण अपघाताची घटना घडली. आसगाव (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील युवक प्रवास करत असलेली स्कॉर्पिओ गाडी (एमएच 11 डीएन 2340) अचानक नियंत्रण सुटून खोल दरीत कोसळली. ही घटना रायगड जिल्ह्याच्या हद्दीत घडली असून दरी सुमारे 1800 फूट खोल असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
अपघाताची माहिती मिळताच रायगड व सातारा जिल्हा पोलीस प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. महाबळेश्वर ट्रॅकर्स, प्रतापगड रेस्क्यू टीम, महाड व पोलादपूर येथील ट्रॅकर संस्था तसेच स्थानिक नागरिकांनी रात्रीपासूनच बचावकार्य सुरू केले आहे. मात्र दुर्गम परिसर, मुसळधार वारा आणि अंधारामुळे मदतकार्यात मोठ्या अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आले.
अपघातग्रस्तांमध्ये महेश अनिल पवार (२५), आदित्य अशोक साळुंखे (२१), रितेश राजेंद्र लोखंडे (२५), सुहास जितेंद्र लोखंडे (२०), अंश समीर चव्हाण (१८), उत्कर्ष आनंद शिंगटे (२१), अनिल अभिमन्यू शिंगटे (२५) आणि नितीन किसन नायकोंडे (३५, सर्व रा. आसगाव, ता. कोरेगाव, जि. सातारा) यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरू असून प्रशासनाकडून अधिकृत माहितीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

0
0 views

Comment