logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

बौद्ध समाजातील महिला व आई-बहिणींविषयी आक्षेपार्ह पोस्ट; विलास काकडेच्या अटकेसाठी आंबेडकरी तरुण एकवटले

छत्रपती संभाजीनगर : आंबेडकरी तरुणांच्या मोठ्या संख्येने एकत्र येऊन सोशल मीडियावर बौद्ध समाजातील महिला तसेच आई-बहिणींविषयी अश्लील, आक्षेपार्ह आणि समाजात तेढ निर्माण करणाऱ्या पोस्टसंदर्भात विलास काकडे याच्याविरोधात तात्काळ गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्याची मागणी केली.

सिडको एन-७ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांना निवेदन सादर करत आंबेडकरी तरुणांनी संबंधित व्यक्तीविरोधात कठोर कायदेशीर कारवाईची मागणी केली. निवेदनात सामाजिक सलोखा बिघडविणारा आणि द्वेष पसरवणारा असा सोशल मीडियाचा वापर गंभीर गुन्हा असल्याचे नमूद केले गेले. त्यांनी भारतीय न्याय संहिता तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार तात्काळ कारवाई करण्याचा आग्रह धरला आणि अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

या वेळी मोठ्या संख्येने आंबेडकरी समाजातील तरुण, सामाजिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते आणि त्यांनी अशा प्रकारच्या पोस्टमुळे समाजाच्या भावना दुखावल्या गेल्याचा निषेध व्यक्त केला.

0
92 views

Comment