logo
Select Language
Hindi
Bengali
Tamil
Telugu
Marathi
Gujarati
Kannada
Malayalam
Punjabi
Urdu
Oriya

अकोट: भूमी अभिलेख विभागाच्या चुकीच्या मोजणीवर दंडित अधिकाऱ्यांवर ₹२५ हजार दंड

अकोट : भूमी अभिलेख विभागाच्या शेतजमिनीच्या मोजणीतील त्रुटी आढळल्यास संबंधित शेतकऱ्यांना ग्राहक मंचामार्फत न्याय मिळू शकतो, असा महत्त्वपूर्ण निकाल राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिला आहे. खामगाव तालुक्यातील एका शेतकऱ्याच्या जमिनीच्या मोजणीमध्ये क्षेत्रफळातील तफावत आणि हद्द कायम न करण्याबाबत तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी जिल्हा ग्राहक मंचाच्या निर्णयाविरोधात २४ जुलै २०२२ रोजी नागपूर येथील राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगात अपील दाखल करण्यात आली होती.

आयोगाने या प्रकरणाचा निकाल जाहीर करताना तत्कालीन उपअधीक्षक भूमी अभिलेख आणि संबंधित मोजणी अधिकाऱ्यावर प्रत्येकी ₹२५ हजारांचा दंड ठोठावला आहे. भूमी अभिलेख विभागाच्या कामकाजातील त्रुटीविरोधात ग्राहकांना न्याय मिळवून देणारा हा निर्णय शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांसाठी मार्गदर्शक ठरणारा मानला जातो. सेवानिवृत्त उपअधीक्षक भूमी अभिलेख दिलीप वानखडे यांनी सांगितले की, मोजणी चुकीची आढळल्यास प्रथम विभागाकडे लेखी तक्रार करावी, न मिळाल्यास ग्राहक तक्रार निवारण मंचाकडे न्याय मागता येतो.

2
3 views

Comment