यवतमाळ : साहेबराव कांबळे शिवसेनेत प्रवेश
यवतमाळ : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसला तोंडघशी पाडणारे साहेबराव कांबळे यांनी आठवड्याभरापूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि आता ते थेट शिवसेनेत प्रवेश करणार असल्याने यवतमाळच्या राजकीय वर्तुळात मोठा भूकंप झाला आहे.
कांबळेंच्या या निर्णयामुळे महाविकास आघाडी अंधारात राहिली आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना बिनविरोध विजय मिळाला. काँग्रेसच्या अधिकृत उमेदवाराने पक्षाच्या हक्काच्या जागेवर अचानक मागे हटल्याने काँग्रेस आणि महाविकास आघाडीची प्रतिष्ठा खालावली आहे.