logo

संजयनगर (शेरे) येथे नरवीर उमाजी नाईक जयंती साजरी

आद्यक्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांची संजय नगर शेरे तालुका कराड येथे जयंती साजरी करण्यात आली यावेळी संजय नगर ग्रामपंचायतीचे उपसरपंच सर्जेराव मदने यांनी नरवीर उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

यावेळी बोलताना सर्जेराव मदने म्हणाले,ब्रिटिश सरकार विरुध्द बंड करून राजे उमाजी नाईकांनी इंग्रजी सतेचा बीमोड करण्यासाठी आहोरात्र प्रयत्न केले.

गोरगरिब जनतेची होणारी पिळवणूकथांबवली .आपल्या कर्तृत्वाच्या जीवावर त्यांनी जुलुमी ब्रिटिशाना सळो की पळो करून सोडले अशा योग पुरुषांचे विचार आत्मसात करून त्या प्रमाणे वागले पाहिजे.

ही खरी आदरांजली ठरेल ,असे मत संजयनगर शेरे ग्रामपंचायत चे उपसरपंच सर्जेराव मदने यांनी व्यक्त केले. आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या २३० व्या जयंतीनिमित्त आदरांजली वाहण्यात आली. यावेळी अशोक मस्के , संतोष सातपुते, अशोक आडके , सुनील शिंगाडे, ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते

137
35801 views