logo

पोलिसपाटलांविना गावगाड्याला ब्रेक

( बाजीराव वसावे नंदुरबार रिपोर्ट) तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलिसपाटीलपदांच्या तब्बल 93 जागा रिक्त आहेत पोलिसपाटलाविना संबंधित गावांचे कामकाज सुरू आहे. त्यामुळे एकंदरीत ग्रामस्थांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रिक्त जागा तत्काळ भरण्याची मागणी संबंधित गावांतील ग्रामस्थ तसेच आदिवासी शेतकरी मजुर कामगार जनता संघटना महाराष्ट्र प्रदेश संघटनेच्या माध्यमातून मागणी करण्यात आली आहे.तळोदा उपविभागात येणाऱ्या तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात पोलिसपाटीलपदाच्या 93 पक्षो अधिक जागा रिक्त आहेत.पोलिसांच्या दुत ठरलेला व स्थानिक पातळीवर शांतता व सुव्यवस्था राखण्याकामी पोलिसांचा दुवा असलेला पोलिसपाटीलच गावात नेमणूकीस नसल्याने गावात होणारी भांडणे गावातील माहिती पोलिस व सरकारी कार्यालयात कोणी पुरवायची हा मोठा प्रश्न अनेक गावांत निर्माण झाला आहे. रिक्त जागांमुळे एक पोलिसपाटलाकडे चार ते पाच गावांचा कारभार सोपविण्यात आला आहे.गावात पोलिपाटीलच उपलब्ध नसल्याने सर्वाधिक अडचण पोलिस प्रशासनाची होत आहे.
घटना घडल्यानंतर पोलिसांनी माहिती देण्यासाठी गावातील कुणी पुढाकार घेत नाही.
गावातील सामाजिक, राजकीय वातावरण नेत्यांच्या भेटी, कायदा व सुव्यवस्था याबाबतचे गोपनीय अहवाल प्रशासनाला मिळेनासे झाले आहेत.ग्रामस्थांना पोलिसपाटलाच्या दाखल्यासाठी वणवण फिरावे लागत आहे. पोलिसपाटलांची पदे रिक्त असल्यामुळे पोलिसांच्या कामावर अतिरिक्त ताण येत आहे.त्यामुळे पोलिसपाटलांची पदे तत्काळ भरण्यात यावीत अशी मागणी होत आहे.
तळोदा तालुक्यातील रिक्त पदे तळोदा तालुक्यातील अनुसूचित क्षेत्रातील अमोनी, सिलिंगपूर ,लक्कडकोट ,बुधवाली,संझणी,नळगव्हाण,रापापूर,मेंढवळ,नवागाव,शेलवाई,सलसाडी,उमरकुवा,राणीपूर,कुंडवे,बांधारा,सावर,गाढवली,राजविहीर,अलवान,ढेकाटी,सिंगसपूर,झिरी,लाखापूर,पाठडी,बारेद,बियामाळ,कढले,आमलाड,खेडले,धवळीविहीर,मोहिदा,चौगावबुदुक,मोड,जुवाणी,आष्टेतर्फ,बोरद,कळमसरे,छोट धनपूर, असे एकूण 37 गावात पोलिसपाटीलपदे रिक्त आहेत.
2)अक्कलकुवा तालुक्यातील रिक्त पदे
अक्कलकुवा तालुक्यातील महुखाडी, नैनशेवडी, ओघाणी,बामणी,रेथी,देवमोगरानगर,जूगलखेत,मांडवी,काठी,मोलगी,जामली,उमरकुवा,बारीसुरगस,धनखेडी,बिजरीपाटी,सिंदुरी,चिमलखेडी,भराडीपादर,महुपाडा,गमण,गलोठा,बुदूक,रायसिंगपूर,पिंपरीपाडा,जुनानागरमुठा,वाण्याविहीर,खुर्द,घुनशी,वाण्याविहीरबुदूक,खोडी,बोरीपाडा,गोटपाडा,वडफळी,नाला,कौली,सिंगपूरखूर्द,कुंभारखाण,कंकाळी,आमलीबारी,ब्रिटिश अंकुश विहीर, खापरान,मोवान,पिंपळगाव,मणिबेली,भगदारी,वालंबा,पळासखोब्रा,ठाणा,डनेल,मुखडी,सरी,वेरी,बालघाटा,माळा,ओरपा,उखळसाग,वडली,अशी एकूण 56 गावांमध्ये पदे रिक्त आहेत.

7
4793 views