logo

कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीने नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव, अक्कलकुवा, नंदुरबार, तळोदा, नवापूर या तालुक्यातील गोर गरीब आदिवासी जनतेकडून 6 कोटी 82 लाख 30 हजार फसवणूक केली आहे.

(नंदुरबार जिल्हा न्यूज रिपोर्ट बाजीराव वसावे )कलकाम रिअल इन्फ्रा इंडिया लिमिटेड कंपनीचे चेअरमन विष्णू पांडुरंग दळवी रा सावंतवाडी जि सिंधुदुर्ग ) याला अक्कलकुवा पोलीस तपास अधिकारी जितेंद्र महाजन साहेब यांना ठाणे येथून दिनांक 17/7/2024 रोजी अटक केली आहे त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता विष्णू पांडुरंग दळवी याला 23 जुलै पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे या कंपनीने नंदुरबार जिल्ह्यातील धडगांव, अक्कलकुवा, तळोदा, नंदुरबार, नवापूर, या तालुक्यातील गोर गरीब आदिवासी जनतेकडून 6 कोटी 82 लाख 30 हजार 151 रूपये पैसे गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल असे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.

42
16591 views