
SSC Results दहावीच्या निकालाचा महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा शिवाजीनगर तांडा तालुका जळकोट जिल्हा लातूर या शाळेचे घवघवीत यश विद्यार्थ्यांना 100 टक्के गुण, मुलानी मारली बाजी*
संस्थेचे अध्यक्ष श्री रामरावजी राठोड व शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी राठोड सहशिक्षक श्री होनशेट्टे आर .बी. श्री गायकवाड बि. व्ही. श्री केंद्रे बी एस श्री सगर एस. एम. श्री केंद्रे डी.पी.श्री राठोड व्ही आर.शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी राठोड यांनी दिल्या विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस शुभेच्या
लातूर :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर यांनी एस एस सी परीक्षा मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये माध्यमिक आश्रम शाळा शिवाजीनगर तांडा तालुका जळकोट जिल्हा लातूर या शाळेने घवघवीत यश प्राप्त केलेले आहे शाळेतून एकूण 55 विद्यार्थी परीक्षेत बसलेले होते त्यापैकी 53 विद्यार्थी उत्तीर्ण झालेले असून शाळेचा एकूण निकाल 96.36% लागलेला असून शाळेमधून प्रथम विद्यार्थी पवार राजू उत्तम ८८.६० टक्के घेऊन शाळेतून पहिला क्रमांक पटकावलेला आहे शाळेतून दुसरी विद्यार्थिनी वनमारे श्रद्धा रामदास 85.80% गुण घेतलेले आहेत शाळेतून तृतीय क्रमांक जाधव भास्कर धोंडीबा ८५ .00टक्के घेऊन उत्तीर्ण झालेल्या आहे तसेच शाळेतून 75 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेले एकूण विद्यार्थी 22 आहेत सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष श्री रामरावजी राठोड व शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी राठोड सहशिक्षक श्री होनशेट्टे आर .बी. श्री गायकवाड बि. व्ही. श्री केंद्रे बी एस श्री सगर एस. एम. श्री केंद्रे डी .पी.श्री राठोड व्ही आर यांनी अभिनंदन केलेले आहे .शाळेचे मुख्याध्यापक श्री तानाजी राठोड यांनी ज्यादा तासिकेचे नियोजन केल्यामुळे शाळेने एस.एस.सी .परीक्षेमध्ये यश संपादन केल्याचे दिसून आलेले आहे .तसेच संस्थेचे सहसचिव श्री जयपालजी राठोड यांचे सुद्धा मोलाचे सहकार्य लाभलेले आहे.