logo

जवळा गणातून पंचायत समिती उपसरपंच पैलवान दत्ता शिंदे निवडणूक लढवणार , विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचे कट्टर समर्थक म्हणून पैलवान दत्ता शिंदे यांची ओळख....

अहिल्यानगर प्रतिनिधी राविराज शिंदे.
स्थानिक स्वराज्य निवडणुकीचे वारे हळू हळू वाहू लागले असून गावपातळीवर स्थानिक पुढारी कामाला लागले आहेत. भारतीय जनता पार्टीचे तालुका उपाध्यक्ष तथा धोंडपारगावचे उपसरपंच पैलवान दत्ता शिंदे यांनी जवळा गणातून पंचायत समिती साठी निवडणुकीची जोरदार तयारी केली आहे.विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे साहेब यांचे खंदे समर्थक म्हणून पैलवान दत्ता शिंदे यांची ओळख आहे. जवळा गणातून त्यांनी चाचपणी सुरू केली असून पक्षासाठी दिलेला वेळ, नेतृत्वावर दाखविलेली निष्ठा निवडणूक लढविण्यास संधी देणारी ठरेल, असा त्यांना विश्वास आहे. असे असले तरी उमेदवारीचा चेंडू विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांच्या कोर्टात असल्याने त्यांची भूमिका अंतिम राहणार आहे. त्यांचे जवळा गणात वर्चस्व असून मोठा मित्र परिवार , हीच त्यांची प्रामुख्याने ओळख आहे.



उपसरपंच असताना विविध विकासकामे

पैलवान दत्ता शिंदे यांनी भारतीय जनता पार्टीची उपाध्यक्ष पदाची धुरा सांभाळत उपसरपंचपदाची देखील जबाबदारी व्यवस्थित सांभाळली आहे. त्यांच्या कार्यकाळात विविध विकास योजनांना गती दिली. विकासकामे व कार्यकर्त्यांच्या बळावर ते निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाले आहेत.

विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे यांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांसाठी म्हणून अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यांचा लोकसंपर्कही मोठा आहे. त्यामुळे जनमताचा कौल आजमविण्याची तयारी त्यांनी सुरू केली आहे. जवळा पंचायत समिती गणातून उमेदवारी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला असून उपसरपंच असून गेल्या कित्येक वर्षांपासून भाजप कार्यकर्त्यांसाठी उत्तम रीतीने ते काम करीत आहेत.

उपसरपंच पदाची धुरा त्यांनी सांभाळत ग्रामीण भागातील विकासकामे करत राजकीय वारसा पाठीशी असलेले हे युवक नेतृत्व उपसरपंच पद सांभाळत गावगाडा सांभाळत आहे. येथील ग्रामपंचायतीची सत्ता सातत्याने हाती राहिलेली आहे. गावात विविध विकासाच्या योजना त्यांनी राबविल्या .

40
2915 views