logo

धारुर, अंजनडोह गावातील मराठा सेवकाने अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या राज्यव्यापी बैठकीस जाण्यासाठी केली तयारी

मराठा आरक्षणासाठी सुरू असलेला संघर्ष हा अद्यापही सुरूच आहे,
मराठा आरक्षणासाठी व मराठांच्या विविध प्रश्न मार्गी लागण्यासाठी , मनोज दादा जरांगे पाटील यांनी मुंबई येथे जाऊन आंदोलन करण्यात येईल असा सरकारला इशारा दिला आहे, तरी देखील सरकार अद्याप ही मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर ठोस पावले ऊचलतानां दिसत नाही, त्यामुळेच जरांगे पाटील देखील आक्रमक होऊन मुंबईला जाण्याची तयारी करण्यासाठी यात्या 29 जुन 2025 रोजी मराठा समाजाची राज्यव्यापी बैठक अंतरवाली सराटी येथे आयोजित केली आहे ,
त्याच अनुषंगाने गावा-गावातुन मराठा सेवक बैठकीस जाण्यासाठी तयारीला लागले आहेत,
धारुर तालुक्यातील अंजनडोह या गावातुन मराठा स्वयंसेवकांनी मोठी तयारी केल आहे,
काल रात्री बैठक घेऊन, त्या बैठकीत अंतरवाली सराटी येथे बैठकीस जाण्यासाठी
गावातुन 15 ते 20 गाड्या व आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, पुरुष 400 ते 500 व महिला देखील 200 ते 300 या छोट्याशा गावातून जाण्याची शक्यता वृतवली जात आहे,
अंतरवाली सराटी येथे राज्यव्यापी बैठकी आगोदर सरकारने मराठा आरक्षणाच्या बाबतीत ठोस पावले उचलली नाहीत,तर पुढे मुंबईला होणारे हे मराठ्यांचे आंदोलन सरकारला खूप जड जाईल...


28
2504 views