logo

उदगीरमध्ये महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

उदगीरमध्ये महिलेवर अत्याचार; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल


उदगीर :- उदगीर शहरातील एका वसाहतीत एका महिलेवर अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी उदगीर शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उदगीर शहर पोलीस स्टेशन येथे हजर येऊन तक्रारी जबाब लिहून घेण्यास सांगते की,मी उदगीर शहरात राहत असुन मला पती नामे बालाजी, एक मुलगी, दोन मुलं असा परिवार आहे. मी LIC एजंट म्हणून काम करते. मी LIC चे काम करीत असताना माझी आणि संतोष प्रकाश भालेराव राहणार मलकापुर ता उदगीर याचे सोबत ओळख झाली होती. त्याने मला दोन कस्टमर दिले होते. त्याचे व माझे नंतर नेहमी फोनवर बोलणं होत होते. त्याची व माझी चांगली ओळख झाली.
नोव्हेंबर 2024 मध्ये तारीख व वेळ नक्की माहिती नाही, मी माझे घरी असताना मला संतोष भालेराव याने मला फोन करून कळविले की, माझे एका मित्राला LIC काढायची आहे, त्याबद्दल आपण बोलूत तुम्ही बसस्थानक उदगीर येथे या. त्यावरून मी थोड्यावेळाने बसस्थानक उदगीर येथे गेले. तेथे गेल्यावर मी त्यास कोण मित्र आहे. कुठला आहे. याबाबत विचारले. त्याने मला सांगितले की कमलनगरचा एक मित्र आहे. त्याची LIC काढायची आहे. तो कमलनगरला आपल्याला भेटणार आहे. आपल्याला कमलनगर येथे जावे लागेल असे म्हटलं त्याप्रमाणे मी ठीक आहे असे म्हणाले व त्याच्यासोबत कमलनगर येथे जाण्यास तयार झाले, नंतर मी व संतोष भालेराव असे उदगीर बसस्थानक येथून बस मध्ये बसून कमलनगर येथे गेलो. कमलनगर येथे गेल्यानंतर त्याने त्याचे एका मित्राला फोन लावला, मला सांगितलं की, मित्राला यायला वेळ लागणार आहे, आपण हॉटेलमध्ये जाऊन नाष्टा करून घेउत. मी तेथेच त्याला बोलून घेतो, तो आल्यावर आपण त्याला बोलु असे म्हणाला. नंतर बस स्टॉप च्या जवळ असलेल्या एका हॉटेलमध्ये घेऊन गेला. सदर हॉटेलमध्ये खाली नाष्टा व जेवणाची व्यवस्था होती. हॉटेलमध्येच बार पण होता. त्यामुळे मी तिथे नाष्टा करणार नाही असे त्याला सांगितले. त्यावरून संतोष भालेराव यंनक मला म्हटला की वरच्या मजल्यावर लॉज आहे. आपण लॉज मधील रूमवर आपण थांबु, त्याच ठिकाणी नाष्टा बोलवुन घेतो व मित्राला पण LIC च्या कामासाठी बोलतो. नंतर वरच्या मजल्यावर जाऊन संतोष याने लॉज मधील एक रूम बुक केली. दुपारी 04.00 सुमारास मी आणि संतोष रूम मध्ये गेलो. मी त्यास मित्र कधी येणार आहे असे विचारले. त्याने कोणालातरी फोन केला, मला सांगितले की त्याला यायला उशीर आहे. तो सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत येणार आहे. तोपर्यंत आपण येथेच थांबू आम्ही सायंकाळी 06.00 वाजेपर्यंत तिथेच थांबलो. 06.00 वाजले तरी त्याचा मित्र आला नव्हता, त्यावेळेस मी त्यास म्हणाले की तुमचा मित्र येत नाही. मला घरी जायला उशीर होत आहे. मी जाते. नंतर पुन्हा आपण त्यांना भेटू म्हणून सांगितले आसता लगेच त्याने त्याचे मित्राला फोन केला. नंतर मला म्हणाला की. तो 07.30 वाजेपर्यंत येणार आहे. मी पुन्हा 07.30 वाजेपर्यंत त्याची लॉजला वाट पाहिली. 07.30 वाजेपर्यंत देखील कोणी आलेच नाही. मला घरून कॉल येत असल्याने मी संतोष भालेराव यास संगीतले की मला आता घरी जावं लागते, असे म्हणून माझी बॅग घेऊन लॉज मधून बाहेर निधत होते. त्यावेळी त्याने मला बाहेर येऊ दिले नाही रूमचा दरवाजा लावून घेतला. मला म्हणाला की, मी तुम्हाला काही करत नाही तुम्ही शांत बसा, नंतर मला घरचे खूप फोन येत होते मी घरी सांगितलं की कमलनगरला आहे मला यायला थोडा वेळ होणार आहे असे सांगितले.
फोनवर बोलत बोलत 08.30 वाजले होते. तेव्हा मी परत घराकडे येण्यासाठी रूम मधून निघाले, त्याने मला उदगीरला जाण्यासाठी आता गाडी भेटत नाही. तुम्ही माझ्यासोबत आल्या आहात. तुम्ही एकट्या गेल्यावर तुम्हाला काही झाले तर माझ्यावर नाव येईल. तुम्ही आजच्या दिवस इथेच मुक्काम करा मी तुम्हाला काही करणार नाही असे म्हणाला. त्यावर मी ठीक आहे, असे म्हणाले व तेथेच थांबले. रात्री 10.00 वाजण्याच्या सुमारास त्याने जेवण मागवले. मी थोडे जेवण केले. जेवण झाल्यानंतर आम्ही दोघे रूममध्ये बोलत बसलो, नंतर रात्री 12.30 सुमारास मी रूम मधील पलंगावर व तो पलंगाचे खाली झोपला. अचानक रात्री 01.00 ते 02.00 वाजण्याच्या सुमारास
संतोष भालेराव हा ऊठून माझ्याजवळ येऊन झोपला. मला म्हणाला की, तू माझ्यासोबत लॉजवर आहेस याबाबत मी तुझ्या नवऱ्याला सांगतो. नाहीतर मला तुझ्यासोबत शारीरिक संबंध करू दे असे म्हणन धमकी दिली व माझ्या सोबत बळजबरीने इच्छे विरुद्य शारीरिक संबंध केला सकाळी मी लॉज मधून बाहेर आले, तो माझ्या सोबतच बाहेर आला, मला म्हणाला की तू कोणाला काही सांगु नकोस, माझी काही इज्जत जाणार नाही तू बाई आहेस तुझीच इज्जत जाईल, तुझ्या लेकराचे भविष्य खराब करतो, असे म्हणुन धकमी दिली. मी कमलनगर येथून बसने उदगीर येथे माझ्या घरी आले. नंतर तो मला बरेच वेळेस फोन करून बोलत होता व तु झालेल्या प्रकाराबद्दल कोणाला काही सांगू नको नाही तर तुला बघून घेतो असे धकमी देत होता. संतोष भालेराव याने मला तु कोणाल सांगितलेस तर झालेले प्रकाराबद्दल तुझ्या नवऱ्याला य नातेवाईकाला सांगतो अशी धकमी होती, त्यामुळे माझी समजात बदनामी होईल म्हणुन सदरील महिला उदगीर शहर पोलीस ठाण्यात येऊन तक्रार दिली आहे पुढील तपास उदगीर शहर पोलीस करीत आहे

28
2604 views