logo

अत्याचार उदगीर | उदगीर शहरातील एका एलआयसी महिला एजंटला माझ्या मित्राची एलआयसी पॉलीसी काढायची आहे, म्हणून कर्नाटक राज्यातील कमालनगर येथील एका लॉजवर बोलावून घेऊन लैंगिक ाचार केले. याप्रकरणी सोमवारी (२८ जुलै) रात्री उदगीर शहर पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पॉलिसीच्या बहाण्याने लॉजवर नेवून दुष्कर्म

अत्याचार उदगीर | उदगीर शहरातील एका एलआयसी महिला एजंटला माझ्या मित्राची एलआयसी पॉलीसी काढायची आहे, म्हणून कर्नाटक राज्यातील कमालनगर येथील एका लॉजवर बोलावून घेऊन लैंगिक ाचार केले. याप्रकरणी सोमवारी (२८ जुलै) रात्री उदगीर शहर पोलिस ठाण्यात एकाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नोव्हेंबर २०२४ मध्ये रात्री एक ते दोनच्या दरम्यान कमालनगर बसस्थानक जवळ एका हॉटेल मधील लॉजवर संशयित आरोपीने फिर्यादीस एका मित्राची एलआयसी ची पॉलीसी काढायची आहे, असे सांगुन फुस लाऊन घरून उदगीर येथून कलमलनगर, कर्नाटक येथे एका लॉजवर नेले. तिथे फिर्यादी सोबत बळजबरीने इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध केले. कोणाला माहिती सांगितली तर बदनामी करण्याची धमकी दिली. अशी फिर्याद ३४ वर्षीय एलआयसी महिला एजंट यांनी दिल्यावरून उदगीर शहर पोलिस ठाण्यात कलम ६४(१), ३५१ (१), (२) नुसार संतोष प्रकाश भालेराव (रा मलकापूर ता. उदगीर) याचे विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

48
5048 views