logo

देऊळवाडी ते गुंडपंत दापका रस्ता निकृष्ट दर्जाचे – ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

देऊळवाडी ते गुंडपंत दापका रस्ता निकृष्ट दर्जाचे – ग्रामस्थांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार

लातूर, प्रतिनिधी – उदगीर तालुक्यातील देऊळवाडी ते गुंडपंत दापका रस्त्याचे नुकतेच करण्यात आलेले डांबरीकरणाचे काम अवघ्या काही महिन्यांत खराब झाले असून, या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या बाबत ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

स्थानिक रहिवासी श्री. केंद्रे प्रकाश मधुकर यांनी थेट महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून या रस्त्याच्या निकृष्ट कामाची तक्रार केली आहे. त्यांनी आपल्या निवेदनात नमूद केले की, सदर कामात ठेकेदाराने दर्जा न पाळता मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला असून संबंधित अधिकाऱ्यांनी देखील या कामाची योग्य तपासणी न करता दुर्लक्ष केले आहे.

या रस्त्यामुळे शेतकरी, विद्यार्थी, रुग्ण व सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून अपघाताचे प्रमाणही वाढले आहे.

श्री. केंद्रे यांनी आपल्या पत्रात खालील मागण्या केल्या आहेत:

1. सदर रस्त्याच्या कामाची तातडीने चौकशी करण्यात यावी.
2. दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी.
3. नव्याने दर्जेदार रस्त्याचे काम करून घ्यावे.

ग्रामस्थांनी शासनाकडे याबाबत त्वरित दखल घेण्याची व कारवाई करण्याची मागणी केली आहे.

137
5535 views