logo

मालेगाव | ९ ऑगस्ट २०२५ आज शिवसेना संपर्क कार्यालय, मालेगाव येथे शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आदिवासी दिन व रक्षाबंधन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला.

📍 मालेगाव | ९ ऑगस्ट २०२५
आज शिवसेना संपर्क कार्यालय, मालेगाव येथे शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत आदिवासी दिन उत्साहपूर्वक साजरा करण्यात आला. या प्रसंगी आदिवासी समाजाच्या शौर्य, निष्ठा आणि पराक्रमाचे प्रतीक असलेल्या वीर एकलव्य यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना विनम्र अयाभिवादन करण्यात आले.

यावेळी रक्षाबंधन या पवित्र बंधाचा देखील सोहळा पार पडला. लाडक्या बहिणींनी ना. दादाजी भुसे यांना राखी बांधून, त्यांच्या दीर्घायुष्य, उत्तम आरोग्य आणि यशस्वी कार्यासाठी मंगलाशिर्वाद दिले. या प्रसंगी दादाजी भुसे यांनी बहिणींप्रती आपुलकी व्यक्त करत, व समाजातील बंधुभाव आणि ऐक्य दृढ राहावे, अशी सदिच्छा व्यक्त केली.

18
654 views