logo

*पाथरीत चाललंय तरी काय? अवैध वाळूची वाहतूक बिन बोभाटपणे सुरू* *वाळू माफियांवर नेमकं मेहरबान कोण महसूल प्रशासन की पोलीस प्रशासन*

*पाथरीत चाललंय तरी काय? अवैध वाळूची वाहतूक बिन बोभाटपणे सुरू*

*वाळू माफियांवर नेमकं मेहरबान कोण महसूल प्रशासन की पोलीस प्रशासन*

पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुका नेहमीच अवैध वाळू उपसा व वाहतुकीसाठी ओळखला जाणारा तालुका आहे.कारण पाथरी तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र मोठे असून या ठिकाणी गावागावात मोठ-मोठे वाळू साठे दिसून येत आहे.याच वाळूची सध्या तरी रात्रीच्या वेळेस मोठी अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. यांच्यावर नेमकं कोण मेहरबान आहे महसूल प्रशासन की पोलीस प्रशासन हे कळायला मात्र मार्ग नाही कारण रात्रभर चालू असलेली अवैध वाळू वाहतूक बिनबोभाटपणे चालू आहे.
सविस्तर बातमी अशी की उन्हाळ्यामध्ये पाथरी तालुक्यातील उंबरा,गोंडगाव,गुंज या ठिकाणी गोदावरी नदी पात्रामधून अवैधरीत्या वाळूचा उपसा करून मोठ-मोठे साठे करण्यात आलेले आहेत. त्यामध्ये उमरा गावामध्ये प्रत्येकाच्या शेतामध्ये पत्राचे कंपाउंड करून त्यामध्ये वाळुचा साठा करण्यात आला आहे त्याच बरोबर पाण्याची टाकी परिसर, शाळा परिसर इत्यादी ठिकाणी शेकडो ब्रास वाळू साठे उन्हाळ्यात करण्यात आले असून मागील आठ ते दहा दिवसापासून उमरा येथून टिप्पर व 407 या वाहनाद्वारे जेसीबीच्या साह्याने मोठ्या प्रमाणावर वाळू वाहतूक करण्यात येत असून या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर पाथरी महसूल प्रशासन असो की पोलीस प्रशासन कारवाई का करत नाही हे मात्र कळायला मार्गच नाही त्याचबरोबर उमरा या गावात असलेले वाळूचे साठे महसूल प्रशासन जप्त करेल का याची चर्चा तालुक्यामध्ये सर्वत्र होताना ऐकावयास मिळत आहे एवढी अवैध वाहतूक चालू असताना महसूल प्रशासन व पोलीस प्रशासन करताय तरी काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

70
2867 views