logo

पाथरी-सोनपेठ रोडवर अवैध वाळू वाहतुक करणारा टिप्पर पकडला; वाळूमाफियांनी कारवाई रोखण्यासाठी पथकाच्या गाडीत एक लाख रूपये रक्कम टाकल्याचा आरोप पथकाने सदरील घटना आठ दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवण्याचे कारण काय गाडीत टाकलेले एक लाख रुपये रक्कम न घेता फेकून दीले- नायब तहसिलदार

पाथरी-सोनपेठ रोडवर अवैध वाळू वाहतुक करणारा टिप्पर पकडला; वाळूमाफियांनी कारवाई रोखण्यासाठी पथकाच्या गाडीत एक लाख रूपये रक्कम टाकल्याचा आरोप

पथकाने सदरील घटना आठ दिवस वरिष्ठ अधिकाऱ्यांपासून लपवण्याचे कारण काय

गाडीत टाकलेले एक लाख रुपये रक्कम न घेता फेकून दीले- नायब तहसिलदार

पाथरी(प्रतिनिधी)पाथरी तालुक्यातील गोदावरी नदीच्या पात्रात वाळूच्या अवैध उपसा आणि वाहतुकीवर पोलिसांची कठोर कारवाई सुरु आहे.दी.२६ ऑगस्ट मंगळवार रोजी पाथरी-सोनपेठ रोडवरील टाकळगव्हाण तांडा ते समर्थ नगर तांडा या परिसरात पोलिसांच्या पथकाने अवैध वाळू वाहतूक करणारा टीप्पर पकडला. अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनाला पुढील तपासासाठी पथकाने पाथरी कडे नेताना, वाळू माफियांची पथकाशी ताटातूट झाली. ही वादविवाद वाद विकोपाला जावून नेत्या यांच्या मध्यस्थीत मिटवण्यात आला.
पाथरी तालुक्यात गोदावरी नदीचे पात्र असल्याने वाळूचा मोठ्या प्रमाणावर अवैध उपसा होत असल्याचे स्थानिकांना नेहमीच आढळते. यामुळे वाळू माफियांचे वर्चस्व वाढले असून शासन आणि कायदा अंमलबजावणी यंत्रणेवर प्रश्न उभे राहिले आहेत.
पथकाने पकडलेल्या टीप्परला पुढील कारवाईसाठी पाथरी कडे घेऊन जात असताना परिसरातील वाळु माफीयांमध्ये आणि पथकातील जवानांमध्ये जोरदार वाद निर्माण झाला. आरोप आहे की वाळू माफीयांनी एका लाख रुपयांची रक्कम पथकाच्या वाहनात टाकण्याचा प्रयत्न केला, मात्र पथक प्रमुखांनी ती रक्कम स्वीकारल्याचा दावा नाकारत ती चक्क फेकून दिली असल्याचे स्पष्ट केले.
या घटनेनंतर पोलिस पथकाबरोबर काही खाजगी व्यक्तींचा वावर का आहे,याबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत.तसेच, उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण यांनी या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य कारवाई होईल का, हे पाहणे शेष आहे. तहसीलदार एस.एन.हंदेश्वर यांनी आज दी. २ सप्टेंबर मंगळवार रोजी म्हणजेच आठ दिवसानंतर आमच्या प्रतिनिधी यांनी तहसिलदार सदरील प्रकरणाबाबत माहीती दील्यानंतर पथकातील तीन कर्मचाऱ्यांना बोलावून काय चर्चा केली आहे, याचा खुलासा होण्याची अपेक्षा आहे.
पाथरी तालुक्यातील अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध पोलिसांकडून सातत्याने छापेमारी करण्यात येत असून, अवैध वाळू उपसण्यास प्रतिबंध करण्यासाठी कठोर कारवाई सुरु आहे. मात्र, वाळू माफियांच्या दबावामुळे प्रत्यक्ष कारवाईमध्ये अडचणी येत असल्याचा आरोप वाढत आहे. स्थानिक प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने या कृत्यांवर कठोर नियंत्रण घालण्याची गरज आहे.




चक्क सदरील पथक प्रमुखांनी ती रक्कम फेकुन दीली का याची सखोल चौकशी होईल?

२६ ऑगस्ट रोजी टाकळगव्हाण तांडा ते समर्थ नगर तांडा या परिसरात रात्रीच्या सुमारास पाथरी तहसीलचे नायब तहसीलदार धोपे व त्यांचे सहकारी यांनी अवैध वाळू वाहतूक करणारा वाळूचा टिप्पर पकडला होता त्यामध्ये सदरील वाळूमाफियाने या प्रकरणी कुठलीही कारवाई होऊ नये म्हणून नाय नायब तहसीलदार धोपे यांच्या गाडीमध्ये एक लाख रुपये रक्कम टाकली होती याबाबत आमच्या प्रतिनिधीने नायब तहसीलदार धोती यांना याप्रकरणी विचारणा केली. असते त्यांनी चक्क कबुली दिली की ती रक्कम मी न घेता बाहेर फेकून दिली आहे अशी कबुली दिली आहे. परंतु मजेची गोष्ट आहे की सदरील प्रकार प्रकरण पथकाने आपल्या वरिष्ठापासून लपवलेच का आणि चक्क आठ दिवसानंतर हे पथक प्रमुख सांगतात की ते एक लाख रुपये आम्ही फेकून दिले हे विचार करण्याची बाब आहे.






वरिष्ठ अधिकारी सदरील प्रकरण आठ दिवस लपवल्या प्रकरणी नेमकी काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष

पथकावर होणार कारवाई की सदरील वाहनावर होणार कारवाई

मागील आठ दिवसा खाली म्हणजे 26 ऑगस्ट मंगळवार रोजी रात्री टाकळगाव तांडा ते समर्थ नगर या भागात पाथरी तहसीलचे नव्याने रुजू झालेले नायब तहसीलदार धोपे यांनी काही सहकारी कर्मचारी घेऊन अवैध वाळू वाहतूक करणारे टिप्पर अडवले या वाळू माफिया व सदरील पथकामध्ये शाब्दिक चकमक झाली परंतु वाहनावर कुठलीही कारवाई न करण्यासाठी वाळूमाफियांनी पथकाच्या गाडीमध्ये एक लाख रुपये टाकले हे प्रकरण इथेच न मिटता दोन दिवसानंतर सदरील वाळू माफिया हा पथकातील एका तलाठ्याच्या खाजगी कार्यालयावर गेला आणि त्या ठिकाणी सदरील तलाठी व वाळू माफियामध्ये पुन्हा एकदा वाद पेटला परंतु हा वाद पाथरीतील काही नेतेमंडळीच्या मध्यस्थीने मिटला परंतु हा सर्व प्रकार सदरील पथकाने किंवा पथकातील सदस्यांनी आपल्या वरिष्ठांना कळवला नाही मात्र आमच्या प्रतिनिधींनी सदरील प्रकरण पाथरीच्या उपविभागीय अधिकारी संगीता चव्हाण व तहसीलदार एस.एन हंदेश्वर यांना सांगितला यावर दोन्हीही वरिष्ठ अधिकारी नेमकी काय कार्यवाही करणार याकडे मात्र सर्वांचे लक्ष लागले आहे.

215
12415 views